Subscribe Us

header ads

आ. संदिपभैय्यांची कृतीशीलता : निकृष्टपणाचा गळा काढणारे पडले तोंडघशी; येड्या- गबाळ्यांना दर्जा तरी कळतो का? : अजय सुरवसे

बीड स्पीड न्यूज 

आ. संदिपभैय्यांची कृतीशीलता : निकृष्टपणाचा गळा काढणारे पडले तोंडघशी; येड्या- गबाळ्यांना दर्जा तरी कळतो का? : अजय सुरवसे


बीड, प्रतिनिधी : सध्या बीड मतदारसंघात येड्या गबाळ्यांचा बाजार भरल्याचे दिसतय. दर्जेदार कामाची ओरड करून शासन- प्रशासनाची दिशाभूल करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आपणच शाहणे असल्याचा आव आणला जातोय. मात्र या येड्या- खुळ्यांना दर्जा तरी कळतो का? असा थेट सवाल आ. संदिपभैय्या क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक अजय सुरवसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केलाय.
गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत बीड मतदारसंघाचा मूलभूत व शासवत विकास व्हावा, यासाठी रक्ताचे पाणी करून मतदार संघातील दर्जेदार विकास कामे व्हावीत. म्हणून कायम अट्टहास करणारे आ. संदिपभैय्या विविध खात्यांच्या मंत्र्यांकडे जाऊन विकास निधी खेचून आणत मतदार संघातील रखडलेली व विकासाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ती कामे कशी दर्जेदार करता येतील याकडे ते, स्वतः जातीने लक्ष देतायेत.मात्र काही विघ्नसंतोषी लोक पूर्वीचे मंजूर कामांचे उदघाटन आ. संदिपभैय्या करत आहेत; तर काही सुमारदर्जा वरून गळे काढतायेत. ही कामे पूर्वीच मंजूर झाली होती तर १३ वर्षे आमदार आणि मंत्री पद असताना का केली नाहीत? असा सवाल अजय सुरवसे यांनी उपस्थित केला असून विकास कामे ताटकळत ठेवून बीड मतदार संघातील जनतेला समस्येमध्ये गुंतवून ठेवून वेठीस धरण्याचे महापाप तथाकथित विकास पुरुषाने केले.आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्तेच्या लालसेपायी येड्या- खुळ्यांचा बाजार बीड मतदार संघात भरलाय. सुमार दर्जाची ओरड करून जनतेला दिशाभूल करण्याचे काम केले जात असून शहरांतर्गत होणारे रस्ते आणि त्यातली -त्यात बार्शी नाक्या वरील रस्ता दर्जाहीन होत असल्याचा घसा कोरडा पडे पर्यंत आवाई उठवणाऱ्यांना आ. संदिपभैय्यांनी आपल्या कृतीशीलपणातून चपराक बसवली आहे. बार्शी नाक्यावर होत असलेल्या रस्त्याचे काम स्वतः त्याठिकाणी उभारून पाहिले. मात्र येड्या -खुळ्यांची टीम हे काम दर्जाहीन होत असल्याचे दाखवून देण्यासाठी तिथे आली नाही. देवस्थानच्या जमिनीवर नजर ठेवत, कुठं काही मिळत का? यासाठी खटाटोप करणारे यामुळे तोंडघशी पडले असून बीडची सुजाण जनता आशा येड्या - गबाळ्यांना दाद देत नसल्याचे म्हणत अजय सुरवसे यांनी विरोधकांना टोला लागवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा