Subscribe Us

header ads

३० हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

बीड स्पीड न्यूज 

३० हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

आष्टी_ ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाचा नेट पेमेंटचा चेक देण्यासाठी व जीएसटीचा हप्ता ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा न करता तक्रारदार यांना देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच मागितली. सदरील लाच स्विकारताना ग्रामसेवकला लाचलुचपत प्रतिबंधक बीड  विभागाने रंगेहात पकडला. आरोपीविरूध्द आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी ता. की, आष्टी तालुक्यातील गहुखेल वेलतुरी ग्रामपंचायतच्या इमारत दुरुस्तीच्या केलेल्या कामाच्या बिलाचे तक्रार पेमेंट काढण्यासाठी ग्रामसेवकाने ३० हजाराची लाच मागितली. मात्र गुत्तेदाराने ४२७४२ रूपयांसाठी एवढी रक्कम देण्यास नकार दिला. मात्र सदरील ग्रामसेवक सय्यद शकील जमादार ( मुळ रा. धामणगाव आष्टी जि. बीड) याने चेक देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे संतापलेल्या  गुत्तेदाराने  लाचलुचपत विभागाकडे दि. २३ डिसेंबर रोजी तक्रार दिली.  दुरुस्तीचे केलेल्या कामाचा नेटपेमेंटचा चेक देण्यासाठी व जीएसटीचा ४२७४२ रूपयांचा चेक ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा न करता तक्रारदार आबदार यांना देण्यासाठी पन्नास टक्के रक्कम सय्यद शकील सय्यद जमादार मागणी करत आहेत. दि. २३ डिसेंबर रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता सय्यद शकील सय्यद जमादार यांनी सदरील ग्रामपंचायतीच्या खात्यावर रक्कम न जमा करता रोख स्वरूपात चेक दिला जाईल अशी तडतोड झाली. मात्र सदरील गुत्तेदाराने ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर ३० हजाराची लाच घेताना सदरील ग्रामसेवक रंगेहात पकडला. या प्रकरणी आष्टी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक भारत राऊत, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा