Subscribe Us

header ads

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा दणका; जुगारी पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

बीड स्पीड न्यूज 

बीड_  चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अटक  करण्यात आले होते. या पाच शिक्षकांना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केले आहे. यातील 3 जण जिल्हा परिषदेचे तर दोघे खासगी संस्थेचे शिक्षक आहेत.बीड शहराजवळ चऱ्हाटा फाटा येथे 28 डिसेंबरला पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भाजप जिल्हाध्यांसह 50 जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचाही सामावेश असल्याची माहिती समोर आली होती.दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा प्रशासनाने या शिक्षकांची माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे


1) हरिदास घोगरे (नंदनवन कॉलनी, बीड)
2) भास्कर विठ्ठल जायभाय (रा. पाटोदा)
3) अशोक रामचंद्र सानप (कालिकानगर बीड)
4) बंडू किसन काळे (कालिकानगर बीड)
5) भगवान आश्रुबा पवार(काळेगाव, हवेली)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा