Subscribe Us

header ads

तिसरी लाट भीषण, 80 लाख लोकांना कोरोनाची भीती, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा!

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेत 80 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40  लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली आहे. कोवीड सेंटरसह इतर कामांसाठीही मुनषबळ उपलब्ध करून द्यावे.  त्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ( NHM) केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्राने याला मान्यता दिली पाहिजे. शिवाय NHM कडून या आधिची राहिलेली रक्कम देण्यात यावी.रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औषधांची उपलब्धता खूप गरजेची बाब आहे. केंद्राकडे त्यासाठी मागणी केली आहे. केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसऱ्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत. लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले


तर कडक निर्बंध!

महाराष्ट्रात सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासंदर्भात बोलताना राजेश टोपे यांनी आरसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले  महाराष्ट्रात जर कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल तर निर्बंध लावण्यास हरकत नाही असे डॉ. भारगव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा