Subscribe Us

header ads

राजेगाव व किट्टी आडगाव पशुवैद्यकीय दवाखान्यांचा होणार कायापालट जि.प.सदस्या वनिताताई चव्हाणांच्या प्रयत्नातून दोन्ही गावच्या पशुवैद्यकीय नवीन इमारतीसाठी 60 लक्ष निधी मंजूर

बीड स्पीड न्यूज 

राजेगाव व किट्टी आडगाव पशुवैद्यकीय दवाखान्यांचा होणार कायापालट जि.प.सदस्या वनिताताई चव्हाणांच्या प्रयत्नातून दोन्ही गावच्या पशुवैद्यकीय नवीन इमारतीसाठी 60 लक्ष निधी मंजूर

बीड,दि.4 (प्रतिनिधी)ः- माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बैलांचा बाजारपेठ म्हणून राजेगावाकडे पाहिले जाते. राजेगाव व त्या लगत असलेल्या 40 ते 50 गावातील जनावरांना येथील रुग्णालयात उपचारासाठी व खरेदी विक्रीसाठी जिल्ह्यातील नागरिक येत असतात. मात्र मागील काही काळापासून येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद सदस्या वनिताताई विठ्ठल चव्हाण जिल्हा परिषदेच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करत राजेगाव व किट्टी आडगाव येथे नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या निधीमधून 60 लक्ष रूपये निधी मंजूर झाला असून लवकरच या इमारतीच्या बांधकामास सुरवात करण्यात येणार असल्याने लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट होणार असल्याची माहिती जि.प. सदस्या वनिताताई चव्हाण यांनी म्हटल्या आहेत.टाकरवण सर्कल अतर्गत येणार्‍या राजेगाव व किट्टी आडगाव हे मोठे लोकसंख्येचे गाव आहेत. या गावालगत 40 ते 50 वाडी, वस्ती व तांडे येतात. त्यामुळे साहजिकच जनावरांची संख्याही मोठी आहे. जनावरांना वैद्यकीय उपचारासाठी राजेगाव व किट्टी आडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना सोयीचा ठरतो. आजपर्यंत या दवाखान्यात अनेक शस्त्रक्रियांसह जनावरांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे जनावरांची संख्ये दिवसेंदिवस या दवाखान्याकडे अधिक वळली आहे. मात्र काही दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारत बांधावी, अशी मागणी परिसरातील पशुपालकांनी केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या वनिताताई चव्हाण यांनी आ. प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीचे नेते अमससिंह पंडीत, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जि.प. सभापती जयसिंग सोळंके, पशुवैद्यकीय सभापती सविताताई मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करत आवाज उठविला. वेळोवळी केलेल्या पाठपुराव्याने जिल्हा परिषदेतून दोन्ही रुग्णालयासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.  त्यामुळे लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट होण्याची असल्याची माहिती जि.प. सदस्या वनिताताई चव्हाण यांनी म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक