Subscribe Us

header ads

बीड जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅब चे ना. टोपे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

बीड स्पीड न्यूज 

बीड जिल्ह्यात कोविड नियंत्रण चांगले, मनुष्यबळ व आणखी सुविधा उपलब्ध करून देऊ - ना. राजेश भैय्या टोपे

बीड जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅब चे ना. टोपे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

कोविडचा पुढील संभाव्य धोका लक्षात घेत जिल्ह्यात पूर्वतयारी चांगली, आवश्यक मनुष्यबळ देखील उपलब्ध करून घ्यावे - धनंजय मुंडे यांची सूचना

मराठवाड्यातील मोठी टेस्टिंग लॅब, एका दिवसात 5 हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता; पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे राजेश टोपेंचे आश्वासन

बीड (दि. 04) ---- : कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाटेत बीड जिल्ह्याने नियंत्रण व उपचारासाठी चांगले काम केले. बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेस आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच जिल्ह्यातील आरोग्य संदर्भातील विविध मागण्यांसाठी राज्यस्तरावर पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्र बैठक 

आयोजित करू, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे यांनी केले आहे.ना. राजेश टोपे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोरोना विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळेचे (RTPCR Lab) चे लोकार्पण करण्यात आले.बीड जिल्ह्यात कोविड काळात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने समर्पित 

भावनेने काम केले, त्यामुळे या काळात अनेकांचे जीव वाचले. कोविडची रुग्णसंख्या बीड जिल्ह्यात नगण्य आहे, तरीसुद्धा मोठ्या शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या व संभाव्य धोका लक्षात घेत बीड जिल्ह्यात आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. या नवीन लॅबला आवश्यक तज्ञ मनुष्यबळ तसेच अन्य कर्मचारी असेल किंवा मागील देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्धी असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून ते पूर्ण केले जाईल. जिल्हा स्तरावर शक्य त्या नियुक्त्या करून कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे; अशा 

सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास केल्या.   बीड जिल्ह्यात कोविडच्या पहिल्या लाटेअखेर अंबाजोगाई येथील एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना चाचणीचे अहवाल वेळेत प्राप्त व्हावेत यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.बीड जिल्हा रुग्णालयात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेत 24 तासात 5 हजार जणांची कोरोना चाचणी करण्याची क्षमता असल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयावरील ताण देखील कमी होणार आहे.या लोकार्पण कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे यांच्यासह 

ऑनलाईन पद्धतीने आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे तसेच आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब काका आजबे, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. संजयभाऊ दौंड, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, मा.आ.प्रा. सुनील धांडे, मा. आ.  सय्यद सलीम, मा. आ. पृथ्वीराज साठे, जि. प. सभापती जयसिंह सोळंके, कल्याण आबुज, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक आर. राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, शिवाजीराव राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांसह आरोग्य विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. सुरेश साबळे यांनी या अद्ययावत कोरोना चाचणी लॅबसह जिल्हा रुग्णालयातील सुविधांची व रुग्णसेवेसंदर्भातील माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.बीड तालुक्यातील नवीन 200 खाटा रुग्णालयाच्या निर्मितीसाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधले. आष्टी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आ. बाळासाहेब आजबे यांनी केली तर माजलगाव येथील उपजिल्हा 

रुग्णालय निर्मिती साठी आ. प्रकाशदादा सोळंके यांनी दोन्ही मंत्री महोदयांना विनंती केली. आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी यांची एकत्र बैठक आयोजित करून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ना. टोपे यांनी दिली.दरम्यान मुंबई-पुणे सह मोठ्या शहरांमध्ये ओमीक्रॉन या नव्या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन पूर्वतयारी करत आहे, नागरिकांनी देखील काळजी घ्यावी व शासकीय नियमांचे पालन करावे, जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा