Subscribe Us

header ads

त्या बालकाची हत्याच !

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_किल्लेधारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील एका 6 वर्षी यशराज वन्यपशूच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची चर्चा सोमवारी (दि.3) झाली होती. मात्र बालकाचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला नसून त्यांची अज्ञात व्यक्ती ने गळा चिरून निर्दयीपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात धारुर पोलिसांत रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील शेळी व मेंढीपालन व्यवसायीक दत्तात्रय आश्रुबा दराडे यांचा मुलगा यशराज (वय 6 वर्ष) हा गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. यशराजच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा आढळून आले होते. नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदरील बालकाचा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्लात जखमी होउन झाल्याची चर्चा सोमवारी ऐकावयास मिळाली. धारूर पोलिस प्रशासनासह वन विभागाला शंका आल्याने सदर प्रकाराची सखोल चौकशी केली. कृर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलिस अधिक्षक  पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालानूसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी वन विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळ पिंजून काढला. यात वन्यप्राण्याचे कसलेही ठसे अथवा खानाखूणा आढळून आले नाहीत. बालकाचा गळा चिरला गेला असल्याने सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा