बीड स्पीड न्यूज
प्रतिनधी नवनाथ गोरे
जि. प. प्रा.शाळा वाकनाथपुर येथे पहिली ते चौथी वर्गाला एकच शिक्षक
वाकनाथपुर प्रतिनिधी_कोरोना महामारी ने दोन वर्ष शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते आता एक महिना पूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी. पालक. शिक्षक खूप खुश झाले आहेत खूप दिवस शाळा बंद राहिल्याने शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे आता विद्यार्थी खूप मेहनतीने अभ्यास करत आहेत परंतु वाकनाथपुर येथे पहिली ते चौथी पर्यत उर्दू आणि मराठी माध्यम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे परंतु मराठी माध्यम ला पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षक आहेत एक शिक्षक असल्याने मुलांना नीट शिकवता येत नाही आणि एक शिक्षक कोणत्या कोणत्या वर्गातील मुलांना शिकवतील हा मोठा प्रश्न आहे एक शिक्षक असल्या कारणाने मुलांचा अभ्यास होत नाही तरी वाकनाथपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लवकरात लवकर आणखीन एक शिक्षकांना रुजू करावे अशी मागणी वाकनाथपुर पालक वर्ग करत आहे.
0 टिप्पण्या