Subscribe Us

header ads

स्वाभिमान आणि मानवी हक्काचे प्रतीक म्हणजेच ऐतिहासिक भिमा कोरेगावचा रणसंग्राम-- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 

स्वाभिमान आणि मानवी हक्काचे प्रतीक म्हणजेच ऐतिहासिक भिमा कोरेगावचा रणसंग्राम

नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 1 जानेवारी भीमा-कोरेगाव शौर्याचा उत्सव देशात उत्सवाने साजरा केला जात आहे भीमा कोरेगावचा रणसंग्रामास आज 204 वर्षे पूर्ण होत आहेत 500 शूर महार योद्धयांनी 28000 पेशवाई सैन्यांचा मोठया धैर्याने सामना करत क्रूर पेशवाईचा अंत केला भिमा कोरेगांवचा रणसंग्राम हा कुठल्या जाती धर्माच्या अथवा  पंथांचा विरोधातला नव्हता तर प्रस्थापित व्यवस्थेने लादलेल्या गुलामगिरी विरोधात पुकारलेला एल्गार होता वर्णवादी  व्यवस्था भेदून काढत आम्ही देखील माणस आहोत आमच्याही मनगटात बळ आहे मग आमचं कर्तृत्व नाकारून आम्हाला गुरा ढोरा सारखी वागणूक का देता? स्वाभिमान मानवी हक्क आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी घडलेला रणसंग्राम म्हणजेच भीमा-कोरेगावचा ऐतिहासिक रणसंग्राम होय,असे प्रतिपादन *भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड* यांनी सम्यक संबुद्ध विहार येथे आयोजित शौर्य दिनानिमित्त अभिवादन पर  कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतानां केले प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध,  छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले याप्रसंगी अशोक कांबळे,मंगेश जोगदंड,राजेश कोकाटे,महादेव वंजारे,विष्णु गायकवाड,सचिन जाधव,उज्वल कोरडे,लखन शिंदे,विशाल जोगदंड,यांचे सह समाज बांधव मोठया संख्येने  उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श जोगदंड यांनी केले तर सूत्रसंचालन मंगेश जोगदंड यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा