Subscribe Us

header ads

उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

बीड स्पीड न्यूज 

उमरी तालुका प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांचा  वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


उमरी प्रतिनिधी_नायगाव मतदार संघाचे लोकप्रिय शेतकरी नेते, मारोतराव व्यंकटराव पाटील  कवळे गुरुजी यांचा वाढदिवस आज 1 जानेवारी 2022 शनिवार रोजी  उमरी शहरात अनेक उपक्रमांनी साजरा  करण्यात आला.
त्यावेळी शेतकरी नेते तथा व्ही.पी.के उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव *#कवळे गुरुजी* यांचे उमरीमध्ये काँग्रेस कमटीच्या वतीने  जंगी स्वागत करण्यात आले व वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना ब्लँकेट आणि फळे वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन विजय आप्पा उत्तरवार यांच्या हस्ते करण्यात आले,त्यानंतर मोंढा मैदान उमरी येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व नेत्र तपासणीस सुमारे चारशे च्यावर नागरिकांनी तपासणी करून घेतली.आणि दुपारी 2 वाजता अभिष्टचिंतन व सत्कार सोहळा संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे होते तर सत्कारमूर्ती आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब, आमदार राजू भैया नवघरे, आमदार जीतेशजी अंतापूरकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे दत्ता हरी चोळखखेकर , एकनाथ जी मोरे गोल्ला गोलेवार समाजाचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवार , संभाजी भिलवंडे मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा