Subscribe Us

header ads

ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालय नववर्षापासून घेऊन येत आहे ‘ग्रंथालय आपल्या दारी’

बीड स्पीड न्यूज 

ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालय नववर्षापासून घेऊन येत आहे ‘ग्रंथालय आपल्या दारी’

बीड । प्रतिनिधी_शहारातील सर्वात जुने असलेले ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालय हे येत्या नवीन वर्षापासून म्हणजेच दि. 1-1-2022 पासून वाचकांच्या आग्रहाखातर ज्येष्ठ नागरीक, महिला गृहिणी, वाचनालयापासून अंतरावर राहणार्‍या वाचक, सभासद ज्यांना वाचनाची आवड आहे परंतू वाचनालयात येऊ शकत नाहीत अशा वाचकांची वाचनाची भूक भागवण्यासाठी संस्थेने येत्या नवीन वर्षापासून म्हणजेज दि. 1-1-2022 पासून ग्रंथालय आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे.ए.एच.वाडिया वाचनालयात 75000 हजार ग्रंथ संपदा आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता व वाचक सभासदांची संख्या लक्षात घेता संस्थेने वाचक, सभासद वाढावेत या दृष्टीने विचार करुन ही योजना अंमलात आणण्याचा विचार केला त्यादृष्टीने दि. 13-12-2021 रोजी झालेल्या विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत या विषयावर चर्चा झाली व त्यास मंजुरी मिळाली. तसेच शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना देखील पत्र पाठवून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व कर्मचारी वृंदाना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही पत्रव्यवहार करावा असे ठरले. त्यानुसार वाचक, सभासद, ज्येष्ठ नागरीक, महिला गृहिणी यांची वाचनांची भूक भागविण्यासाठी संस्थेचा स्तुत्य उपक्रम संस्थेने हाथी घेत “ ग्रंथालय आपल्या दारी ” या योजनेत वाचक सभासद यांनी आपल्या आवडीच्या तीन पुस्तकांची नावे सांगावीत म्हणजे आपणास हवे असलेले व वाचनालयात उपलब्ध असलेले एक पुस्तक आपणास दिले जाईल. महिन्यातून चार ते पाच वेळेस घरपोच ग्रंथ सेवा दिली जाईल.वाचक सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपली वाचनाची भूक भागवावी असे आवाहन वाचनालयाच्या विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाने केले आहे.सभासदांत्वासाठीचे नियम व अटी वाचनालयात पहावयास मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा