Subscribe Us

header ads

एकहाती सत्ता द्या,शहराचा कायापालट करतो-आ.संदिप क्षीरसागर; सचिन दुधाळ यांचा राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश

बीड स्पीड न्यूज 


एकहाती सत्ता द्या,शहराचा कायापालट करतो-आ.संदिप क्षीरसागर
सचिन दुधाळ यांचा राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश


बीड (प्रतिनिधी):- गेल्या 25 वर्षापासून मी तेच-तेच प्रश्न ऐकतोय. रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी मात्र हे प्रश्न काही सुटत नाहीत. नगर पालिकेमध्ये एकहाती सत्ता द्या हे सर्व प्रश्न चुटकसरशी सोडतो अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. ते प्रभाग क्र.2 मधील सचिन 

दुधाळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेशाच्या वेळी बोलत होते. या प्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, जि.प.सदस्य बबन गवते, वैजीनाथनाना तांदळे, कल्याण काका आखाडे, जावेद भैय्या कुरेशी, अजय मोरे, सरपंच बाजीराव बोबडे, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या वार्डातील रस्त्याचे भूमिपुजनही केले.यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराला दहा-दहा, पंधरा-पंधरा दिवसाला पाणी येते, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, अनेक वार्डात प्रकाश दिवे नाहीत 

त्या समस्या मी गेल्या पंचवीस वर्षापासून ऐकतोय. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सत्ता कशाला हवी? माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत तरूण कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं, लढाई कठीण असतांनाही सर्वसामान्य जनता माझ्या पाठिशी उभी 

राहिली. आता मी माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना सर्वशक्तीनिशी ताकद देणार आहे. बीड शहरातील सर्वच्या सर्व जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडुण येतील असा मला विश्वास आहे. सचिन दुधाळ यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहून वार्डातली सर्व 

कामे मार्गी लावू. शहरात अनेकजण माझ्यासोबत येण्यास इच्छुक आहेत. त्यांचेही मी कुठलाही आकस न बाळगता स्वागत करतो. बीड शहरातील मुलभूत गरजांसोबतच बिंदूसरा नदीवरील बंधारा, भाजी मंडईचा कायापालट ही कामेही मार्गी लागतील. आत्तापर्यंत कामे करण्यापेक्षा अडवण्यातच सत्ताधार्‍यांनी वेळ घालवला. यापुढे उद्घाटन झाले की लगेच काम सुरू होईल. तीन-तीन, चार-चार वेळ उद्घाटन होणार नाहीत. मी जे बोलतो ते करतो, खोटी आश्वासने द्यायला मला जमत नाही त्यामुळे एकहाती 

सत्ता द्या मी सर्व प्रश्न मार्गी लावतो अशी ग्वाही देवून आ.संदिप क्षीरसागरांनी सचिन दुधाळ यांना मोठी ताकद देण्याचे सुतोवाच केले. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, जि.प.सदस्य बबन बापु गवते, वैजीनाथ नाना तांदळे, कल्याणकाका आखाडे यांनीही सचिन दुधाळ यांना भक्कमपणे ताकद देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सचिन दुधाळ यांनी आपण वार्डातील कामे आ.संदिप भैय्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने मार्गी लावू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राऊत सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाला वार्डातील सुाशिक्षीत नागरिकांसह महिला वर्ग आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा