Subscribe Us

header ads

एॕक्ट प्लॕनेट एक्टींग अॕकडमी शाखेचे उद् घाटन संपन्न

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःमुक्तपत्रकार आत्माराम ढेकळे,पुणे)

एॕक्ट प्लॕनेट एक्टींग अॕकडमी  शाखेचे उद् घाटन संपन्न               

पुणेः चित्रपट क्षेत्रात नवोदित व गरजु कलावंताना त्यांच्या कलागुणास वाव मिळावा या हेतुने  *एॕक्ट प्लॕनेट एक्टींग अॕकडमी* व चार्ली स्टुडियो  शाखेचे उद् घाटन नुकतेच भवानीपेठ,पुणे येथे 'अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले
            महाराष्ट्रातील स्थानिक कलावंताना सध्याच्या आधुनिक काळात चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट अभिनयाचे ज्ञान देऊन त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी उत्तम मार्गदर्शक म्हणून ' अॕक्ट प्लॕनेट एक्टींग व चार्ली स्टुडियोचे' कार्य उल्लेखनीय आहे.या क्षेत्रात हे हक्काचे व्यासपीठ आहे.अॕकडमी च्या माध्यमातून अनुभवी ,तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.या संधीचा फायदा  नवोदित व गरजु कलावंतानी घ्यावा.असे याप्रसंगी उद् घाटक मेघराज राजेभोसले यांनी बोलतांना आवाहन केले.या कार्यक्रमास मराठी ,हिंदी चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटी उपस्थित होते.
            या अॕकेडमीने आजवर अनेक गुणी कलावंताना संधी दिली असुन महाराष्ट्रात टेक्नीकली एॕडव्हान्स अॕकडमी म्हणून प्रसिध्द आहे.मिडीयात व्यावहारिक शिक्षण तसेच येथे डबिंग,व्हिएफएक्स ,क्रोम,एडिटींग,फोटोग्राफी याचेही शिक्षण मिळणार आहे.या स्टुडियोची विशेष बाब म्हणजे यासाठी कमीत कमी फी आकारणी करुन  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.रमेश खाडे आणि अभिनेते,लेखक ,दिग्दर्शक  प्रीतम एसके पाटील हे या अॕकेडमीची धुरा सांभाळत असुन त्यांनी  *खिचिक* ,  *डाॕक्टर डाॕक्टर*  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.याशिवाय त्यांचे   *जिऊ ,ढिशक्याव*  हे चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर  आहेत .अॕकेडमीची  *मिडीया हेड*  ची जबाबदारी राजु पाटील  तर 'फ्रेशमिंट मिडीया कंपनी '  जनसंपर्काचा कार्यभाग सांभाळत आहे.प्रामुख्याने अॕकेडमीचा व्यवस्थापन कार्यभाग कार्यकारी निर्माते संतोष खरात,स्वानंद देव,विष्णु घोरपडे  यांच्याकडे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा