Subscribe Us

header ads

बीड शहरातील दोन्ही भाजी मंडईत मुलभूत सुविधेसह सुशोभीकरण होणार डीपीडीसीच्या बैठकीत आ.संदिप क्षीरसागर यांच्या मागणीवर पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून विकासाची ग्वाही बीड मतदार संघासाठी मागितला अधिकचा निधी

बीड स्पीड न्यूज 

बीड शहरातील दोन्ही भाजी मंडईत मुलभूत सुविधेसह सुशोभीकरण होणार

डीपीडीसीच्या बैठकीत आ.संदिप क्षीरसागर यांच्या मागणीवर पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून विकासाची ग्वाही

बीड मतदार संघासाठी मागितला अधिकचा निधी
बीड (प्रतिनिधी):- बीड शहरात असणार्‍या पेठ बीड व बुंदेलपुरा भागातील या दोनही प्रमुख भाजी मंडईत मुलभुत सुविधेसह सुशोभीकरणासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्यानंतर सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीनुसार बीड मतदार संघातील अधिकचा निधी दिला जाईल अशी ग्वाही या बैठकीत दिली आहे. बीड शहरात आणि ग्रामीण भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीनुसार विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत जिल्हा नियोजन समितीमधून मंजुर झालेला निधी सर्वच यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.मंगळवार दि.11 जानेवारी 2022 रोजी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2022-23 साठी 288.68 कोटी रूपयांचा त्याचबरोबर अनुसुचित जाती विकास व योजना यासाठी 100 कोटी रूपये व लोकसंख्येचा आधारित ओटीएसपी योजनेसाठी 1.80 कोटी रूपयाच्या प्रारूप आराखड्यास ऑनलाईन पद्धतीने झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे होते. तर या ऑनलाईन बैठकीला बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्याधिकारी अजित पवार, पोलीस अधिक्षक आर.राजास्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी इगारे तर ऑनलाईन पद्धतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहातून आ.संदिप भैय्या क्षीरसागर तर माजलगाव येथून आ.प्रकाश सोळंके, आष्टी येथून बाळासाहेब आजबे व समितीचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी बोलत असतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड मतदार संघाच्या अनुषंगाने विविध विषयांची व मुद्द्यांची मांडणी केली. बीड शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पेठ बीड भागातील व बुंदेलपुरा येथील भाजी मंडईसाठी मुलभूत सुविधा व सुशोभीकरण करण्यात यावे त्यासाठी नाविन्यपुर्ण योजनेतून निधी देण्यात यावा अशी मागणी केली. यावर या समितीचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी या बाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आता या दोनही भाजी मंडईचा कायापालट होणार असल्याचा दिसून येत आहे. त्याच बरोबर बीड शहरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहाचा विषय प्रलंबित आहे. बीड नगर परिषद या विषयात सातत्याने पाठपुरावा करूनही त्रुटींची पुर्तता करत नाही. याबाबत पालिकेला थेट निर्देश देण्यात यावे तसेच धाकडी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी अधिकचा निधी देण्या संदर्भात मंत्रालयीनस्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे त्याचबरोबर बीड शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय 

महामार्गावरील पोल व इतर साहित्य बायपास टू बायपास शिफ्टींग करून कार्यान्वित करणे यासाठी व शहरातील जुने पोल व लाईट शिफ्टींग यासाठी तातडीने निर्देश देवून निधी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. सध्या बीड जिल्ह्यात व बीड शहरात कोव्हिड रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्या धर्तीवर तातडीने उपाय योजना हाती घेण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना द्याव्यात, अत्यावश्यक मशिन, यंत्र सामुग्री, औषध खरेदी करणेबाबत आरोग्य यंत्रणेला सूचना देवून बीड जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी सीटी स्कॅन मशिन व अन्य अत्यावश्यक बाबी पुरवण्यात याव्यात अशी मागणी ही त्यांनी केली. बीड शहरात नगर पालिका मुलभूत सुविधा पुरविण्यामध्ये असक्षम ठरत आहेेत. नगर परिषदेच्या लेखा परीक्षण अहवालामध्ये सातत्याने गंभीर त्रुटी येत असल्याचे अक्षेप घेण्यात आले आहेत. दलित वस्ती योजनेमध्ये सातत्याने अनियमितता आहे. लेखाशिर्ष चेंज करून निधी वळवला जातो आणि विकास कामे प्रलंबित राहतात यासाठी बीड नगर पालिका हद्दीतील विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावी अशी मागणीही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या उंची व सुशोभीकरणास निधी मिळणार


बीड शहरात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. हा पुतळा उंच करणे व परिसरातील सुशोभीकरण आदी प्रश्ना संदर्भात शिष्टमंडळाने केलेल्या मागणी संदर्भात यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी सातत्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केलेली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीनुसार व शिष्टमंडळाच्या भावना लक्षात घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या कामासाठी अधिकचा निधी मिळणार असल्याचे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

200 खाटांच्या नवीन रूग्णालयाचे लवकरच भूमिपुजन

बीड जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, बीडचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे, यांच्या माध्यमातून नवीन 200 खाटांचे रूग्णालय मंजुर झालेले आहे. बीड जिल्ह्याच्या व शहराच्या दृष्टीने या रूग्णालयाचे लवकरच काम सुरू व्हावे व आरोग्याच्या दृष्टीने त्याचा रूग्णांना फायदा व्हावा यासाठी त्यांचे लवकरच भूमिपुजन करण्यात यावे व लवकर काम सुरू करण्यात यावे अशी मागणीही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा