Subscribe Us

header ads

कुक्कडगाव येथे शेतात ठेवलेल्या कापसाची चोरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

कुक्कडगाव येथे शेतात ठेवलेल्या कापसाची चोरी




वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील चोरीच्या घटना घडतच आहेत चोरट्याने आता शेतातील सामान चोरण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.अशीच घटना बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे दिनांक १० जानेवारी सोमवार रोजी घडली आहे. शेतात ठेवलेला कापूस अज्ञात चोरट्याने लंपास केला कुक्कडगाव शिवारातील गट नंबर ३४९ येथे सुनील लक्ष्मण चक्रे. आणि बंडु देवराव चक्रे. यांचे शेत आहे. या दोघांनी शेतातील कापूसाची वेचणी करून शेतातच राहणारे बंडु चक्रे यांचे बंधू अप्पासाहेब देवराव चक्रे यांच्या घरासमोरील जाळी मध्ये कापूस भरलेल्या गोण्या ठेऊन गावात बाजार असल्याने सर्व बाजार करण्यासाठी गावात गेले पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने घरी आणि शेतात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने  जाळीत ठेवलेल्या कापसाच्या गोण्या लंपास केल्या चोरीची ही बाब मंगळवारी परत दुसरा कापूस ठेवायला गेल्यावर सर्वांच्या लक्षात आली चोरी गेलेला कापूस अंदाजे किंमत पंधरा ते वीस हजार रुपयांचा असल्याचे सुनील लक्ष्मण चक्रे. आणि बंडु देवराव चक्रे यांनी सांगितले आहे. आता शेतातील कापूस चोरी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा