Subscribe Us

header ads

पृथ्वीराज,प्रियदर्शनी मुंडे यांचा सत्कार अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश

बीड स्पीड न्यूज 

पृथ्वीराज,प्रियदर्शनी मुंडे यांचा सत्कार अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश



बीड ः प्रतिनिधी_ शहरातील पृथ्वीराज महादेव मुंडे व प्रियदर्शनी महादेव मुंडे या दोघा बहीण-भावाने अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले. याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला.धानोरा रोड भागातील माऊली नर्सिंग कॉलेजच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डॉ.अनंत मुळे, डॉ.संतोष शिंदे, जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन गिरी, शासकीय नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले, भाजपाचे अजय सवाई, शांतीनाथ डोरले, डॉ.महादेव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पृथ्वीराज मुंडे याने अबॅकसच्या किडस् थ्री लेव्हल स्पर्धेत सहभागघेतला होता. यामध्ये 860 गुण मिळवून तो जागतिक स्तरावर पहिल्या पाचमध्ये आला. याबरोबरच अबॅकस लेव्हल 1 सिनीयर परिक्षेतही त्याने यश मिळवले. तर प्रियदर्शनी मुंडे हीने देखील फस्ट लेव्हलमध्ये 720 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अबॅकस लेव्हल 2 परिक्षेत प्रियदर्शनीने यश मिळवले. या दोघांच्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोघांचे अभिनंदनक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.डॉ.महादेव मुंडे यांचा सत्कार श्री भगवानबाबा सेवाभावी संस्थेेचे सचिव डॉ.महादेव मुंडे यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. याबद्दल माऊली नर्सिंग कॉलेजच्या कर्मचारी, प्राध्यापकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नर्सिंग कॉलेजचे शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा