Subscribe Us

header ads

एसआयओ साउथ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरम च्या शिष्टमंडळाने हज हाऊसच्या सिईओंची घेतली भेट

बीड स्पीड न्यूज 


एसआयओ साउथ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरम च्या शिष्टमंडळाने हज हाऊसच्या सिईओंची घेतली भेट

मुंबई  :- हज हाऊसच्या वतीने UPSC निवासी प्रशिक्षण संस्थेत करण्यात आलेले अनावश्यक बदल रद्द कारावेत या आशयाचे पत्र महारष्ट्र ॲक्टिविस्ट फोरम आणि एसआयओ ने  दिले होते त्यानंतर हज हाऊसचे  मुख्य कार्यकारी अधिकारी याकूब शेखा यांनी महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरम आणि एसआयओच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित केले. त्याच अनुषंगाने काल सोमवार दि. 24 जाने. 2022 रोजी सकाळी 11 वा. एसआयओ आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमचे राज्यभरातुन आलेल्या सामाजिक कार्यकर्ते हज हाऊस मुंबई येथे चर्चेसाठी आले होते.हज हाऊसच्या सीईओं सोबत तब्बल दोन तास चर्चा झाली. एसआयओ आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमच्या शिष्टमंडळाने खुप प्रभावीपणे मुद्दे उपस्थित केले, महाराष्ट्रातुन आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर सीईओं विचारना केली असता संबंधित विषयांवर तोडगा काढण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान जवळपास सर्वच मुद्यांवर सीईओंनी सहमती दर्शवली.

चर्चेतील महत्वाचे निर्णय :-

हज हाऊस निवासी प्रशिक्षण संस्थेत 200 विद्यार्थ्यांची क्षमता असुनही केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे.राहीलेल्या 100 विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करुन मंजुरी घेण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले.

- मेन्स परिक्षा लिहणारे ज्या 37 सीनीअर विद्यार्थ्यांना हज हाऊस सोडण्याचे आदेश दिले होते त्यातील जे विद्यार्थी मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असे आश्वासन दिले.

- मेरीट बेसीस पुर्व परिक्षार्थींना किमान 3 वर्षाचा कालावधी मिळावा हा प्रस्ताव ही महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमच्या वतीने देण्यात आला तो प्रस्ताव ही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्याकडे पाठवणार.

- पुर्वी हज हाऊसच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मेस सवलत - सबसिडी बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू केली जाईल म्हणत ही मागणी तात्काळ मान्य केली.

चर्चेत मांडलेल्या सर्वच मुद्द्यावर श्री.याकूब शेख यांनी शिष्टमंडळाला तुमच्या मागण्या रास्त असल्याचे आश्वासन दिले. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि देशाची  उत्तम सेवा करावी अशी आमची इच्छा आहे. त्यांनी अश्वासन दिले कि तुमच्या मागण्या मंत्रालयात तात्काळ प्रस्ताव सादर करुन मंजुरी मिळवून घेऊ.या झालेल्या सकारात्मक चर्चेत महाराष्ट्रभरातून आलेले महाराष्ट्र अॅक्टिविस्त फोरमचे प्रतिनिधी सरफराज अहमद सोलापूर, मौलाना मुबीन सिद्दीकी हिंगोली,अमजत शेख चंद्रपूर, डॉ अंजुम कादरी उदगीर,आसेफ कुरेशी ( एसआयओ साऊथ महाराष्ट्र पिआर आणि मिडिया सेकर्टरी),अबेद खान,जुनेद आतार लातूर,सुफीयान मनियार बीड,फयाज इनामदार श्रीरामपुर, फिरोज शेख अहमदनगर,अहमद सरवर उदगीर,शाहेद(इबादुर्र रहमान) शेख बसमत,सय्यद बासीत देगलुर,मजहर शेख बसमत,अजीम तांबोळी मिरा भाईंदर,राजरत्न शिंदे बीदर,हमीद शेख मुंबई,  अदनान शेख यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा