Subscribe Us

header ads

२४ महिण्यांचे थक्कीत वेतन मिळावे म्हणून ४ सफाई कामगारांचे उपोषण.

बीड स्पीड न्यूज 

२४ महिण्यांचे थक्कीत वेतन मिळावे म्हणून ४सफाई  कामगारांचे उपोषण . 

माजलगाव(प्रतिनिधि): येथील नगरपरिषदेच्या स्वछता विभागात निश्चित वेतनावर  काम केलेल्या ४ कामगारांचे वेतन गेल्या २४महिण्यांचे वेतन थक्कीत असुन ते मिळावे म्हणून त्या कामगारांनी २५जानेवारी मंगळवार रोजी पासून न.प.कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू केले.  याविषयी दिलेल्या निवेदनादात म्हटले आहे. की, त्यांनी यापुर्वी १३/०८ व १२/१२/२०२१असे दोन वेळा उपोषण केल्यानंतर मुख्याअधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले होते. की, त्यांचे थक्कीत वेतन देण्यासाठी लवकरच कारवाई करण्यात येईल यावर उपोषण सोडले होते. याला एका महिण्या पेक्षा आधिक कालावधी उलटून गेला तरीही कामगारांचे वेतन देण्यात आले नाही. यासाठी मुख्याअधिकारी यांना १९जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले होते. व २४जानेवारी पर्यंत वेतन मिळाले नाही तर २५जानेवारी रोजी उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा दिला होता. यानुसार कामगारांनी २५जानेवारी मंगळवार रोजी उपोषण सुरू केले आहे. काशीबाई गायकवाड, लताबाई फंदे, अविनाश अवचार ,शोभा लोंढे या कामगारांचा उपोषणार्थी मध्ये समावेश आहे.     ‌  ‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा