Subscribe Us

header ads

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपची सत्ता; पंकजा ताईंचा राष्ट्रवादीला धक्का, निकालानंतर धनंजय मुंडेंना लगावला टोला

बीड स्पीड न्यूज 

बीड_19 जानेवारी -: बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती आले आहेत. आष्टी पाटोदा शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का समजला जात असून स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली आहे. केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे मोठा धक्का समजला जात आहे.
निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना सणसणीत टोला लगावला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालंय. भाजपला लोकांनी चांगली साथ दिली आहे. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतायत तशी लढत नव्हती, बीड जिल्ह्याच्या गेल्या अडीच वर्षातील लोकांचा रोष आणि अपेक्षांचं निकाल आहे.बीड जिल्ह्यामधील एकही आमदार दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करत नाही त्यामुळे सर्वांगीण विकास कोणी करत नाही. भाजप विरोधी पक्षात नाहीये, सत्ता स्थापनेचा कौल महाराष्ट्राने दिलाय पण केवळ राजकारणामुळे भाजप सत्तेत नाहीये. भाजपचा आकडा वाढतोय त्याकडे आमचं लक्ष आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.


बीड जिल्ह्यातील नगरपंचायत एकूण निकाल (5 नगरपंचायतमधील 85 जागांसाठी निवडणूक)

आष्टी नगरपंचायत


भाजप - 13

राष्ट्रवादी - 02

काँग्रेस - 01

अपक्ष - 01

एकूण - 17

-----------------

शिरूर कासार नगरपंचायत

भाजप - 11

राष्ट्रवादी - 04

शिवसेना - 02

एकूण - 17

-----------------

वडवणी नगरपंचायत

भाजप - 08

राष्ट्रवादी - 06

राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी - 03

एकूण - 17

------------------

केज नगरपंचायत

राष्ट्रवादी - शेकाप - 05

काँग्रेस - 03

जनविकास आघाडी - 08

अपक्ष - 01

एकूण -

-------------------

पाटोदा नगरपंचायत

भाजप - 09

भाजप पुरस्कृत - 06

महावि - 02

एकूण - 17


वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या खात्यात

बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत ही भाजपच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिसकावली आहे. वडवणी नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नेते राजूभाऊ मुंडे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. 3 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने विजय मिळवला आहे तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा