Subscribe Us

header ads

केज नगर पंचायतवर जनविकास आघाडीचे वर्चस्व;राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना धक्का ; मुलीचा केज नगरपंचायत निवडणूकीत पराभव

बीड स्पीड न्यूज 

  केज नगर पंचायतवर जनविकास आघाडीचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना धक्का ; मुलीचा केज नगरपंचायत निवडणूकीत पराभव

केज_ नुकत्याच झालेल्या केज नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. जाहीर झालेल्या निकालानुसार केजकरांनी जनविकास आघाडीला कौल दिला आहे. जनविकास आघाडीने १७ पैकी ८ जागांवर विजय प्राप्त केला. राष्ट्रवादीला ५ तर कॉंगेसला केवळ ३ जागांवर विजय मिळाला असून एक जागेवर स्वाभिमानी पक्षाने विजय मिळवला.
केज नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसला आहे. वार्ड क्रमांक २ मधून त्यांच्या कन्या डॉ. हर्षदा सोनवणे यांचा पराभव झाला आहे. तर जनविकास आघाडीकडून आशाबाई सुग्रीव कराड ह्या विजयी झाल्या. हारून इनामदार यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या जनविकास आघाडीने मात्र दणदणीत यश मिळविले आहे. तर, प्रभाग ५ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अवघ्या दोन मतांनी विजय मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा