Subscribe Us

header ads

नामलगाव फाटा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


नामलगाव फाटा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या





वाकनाथपुर प्रतिनिधी_तालुक्यातील नामलगाव फाटा येथे 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.शरद आनंदराव काशीद (वय 25 रा. कुमशी ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मागील काही महिन्यापासून शरद हा औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेला होता. काल, परवा तो काही कामानिमित्त गावी आला होता. त्यानंतर नामलगाव फाटा येथे बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे घोडके, शिंदे यांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा