बीड स्पीड न्यूज
दिल्या वचनाची आ.संदिपभैय्यांकडून वचनपूर्ती
मोंढ्यातील अडीच कोटी रूपयांच्या रस्ता नालीच्या कामास सुरूवात
व्यापार्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
प्रभाग क्र.3, 14, 15, 16 मध्येही विकास कामांचा फुटला नारळ
बीड । प्रतिनिधी_बीड शहरात व ग्रामीण भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. बीड शहरातील जुना मोंढा भागातील अडीच कोटी रूपयांच्या रस्ता नालीच्या कामास व्यापार्यांच्या हस्ते नारळ फोडून सुरूवात करण्यात आली. त्याचबरोबर प्रभाग क्र.3,14,15,16
मध्ये 2 कोटी 30 लक्ष रूपयांच्या रस्ता नाली या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांची विशेष उपस्थिती होती.बीड शहरातील जुना मोंढा भागातील रस्ता व नालीचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी या भागातील व्यापारी बांधवांनी आ.संदिप भैय्या
क्षीरसागर यांच्याकडे मागील दोन वर्षापूर्वी केली होती. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी व्यापारी बांधवांच्या या मागणीची दखल घेवून या रस्ता व नालीच्या कामासाठी निधी मंजूर करून आणला. या कामाचे आज व्यापारी बांधवांच्या हस्ते नारळ फोडून सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष किशोर पिंगळे, किशोर पगारिया, जवाहर कांकरिया, अशोक
शेटे, नंदूसेट मालपाणी, दत्तासेट तापडिया, अजित छाजेड, खिंवसरा मोरगावकर, नागेशसेट मिटकरी, लुनावत, अमित पगारिया, मदन अग्रवाल, बद्रीनारायन मानधने, रामविलास सोहनी, विठ्ठल गोरे सर, बद्रीनारायन झंवर, गर्जे, अतुल गडगिळे, समाधान कुदंडे, गणेश काळे, मंगेश काळे, दादा कुदंडे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. तर प्रभाग क्र.3 मधील मळ्यातील पद्मा पार्क व हनुमान नगर येथील रस्ता व नालीच्या शुभारंभ प्रसंगी
बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे, नगरसेवक बिभीषण लांडगे, गणेश लोंढे, गणेश जाधव, धुमाळ साहेब, सुशिल सारडा, मनोज थिगळे, अमित पगारिया, पांडूरंग जोगदंड, राजुसेट बंब, छाजेड सर, लोहिया सर, पुनम नहार, धुत सेट, अब्बड, जयमल्हार बागल, गजु क्षीरसागर, अतुल गडगिळे, प्रथमेश कुलकर्णी, अक्षय
लोंढे कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी आ.क्षीरसागरांच्या समवेत वैजिनाथ नाना तांदळे, बबनबापु गवते, कल्याण काका आखाडे, जावेदभाई कुरेशी, शाहेदभाई पटेल, मदन जाधव, पंकजतात्या बाहेगव्हाणकर यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
मोंढ्यातील अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनचे कामही सुरू
शहरातील जुना मोंढा भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अडीच कोटी रूपयांच्या रस्ता नालीचे काम करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज करण्यात आल्यानंतर याठिकाणी अमृत योजनेअंतर्गत करण्यात येणार्या पाईपलाईनचेही कामास सुरूवात करण्यात आली. मोंढा भागात तातडीने पाईपलाईनचे काम पूर्ण करून पाईप व रस्ता नालीचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
0 टिप्पण्या