Subscribe Us

header ads

अबॅकस जागतिक मॅथ चॅम्पियनशिपमध्ये समृद्धी योगेश पिंगळेला सर्वोत्तम मास्टर

बीड स्पीड न्यूज 

अबॅकस जागतिक मॅथ चॅम्पियनशिपमध्ये समृद्धी योगेश पिंगळेला सर्वोत्तम मास्टर

बीड, दि.19 (प्रतिनिधी) ः विद्यार्थ्यांमध्ये जन्मताच असलेल्या सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. बीड मधील अबॅकस व वैदिक स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि वैदिक चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप जी एस ए  दिल्ली आयोजित सहकार्याने 16 जानेवारी 2022 रोजी निकाल जाहीर झाल्याप्रमाणे नेपाळ आणि श्रीलंका, युनायटेड किंग्डम, यु एस ए , सिंगापूर, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका,देशासह भारत देशांमधील 15 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला असून बीडच्या सुपर जिनियस 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट विजयी पदक मिळविले असून  समृद्धी योगेश पिंगळेने जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित समजले जाणारी अबॅकस मॅथ्स  सर्वोत्कृष्ट  मानांकन पारितोषिक ट्रॉफी मिळवत सहा मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडविण्याचा ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. समृद्धी पिंगळेने मिळवलेल्या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षक यांचे सहकार्य लाभले असे त्याने सांगितले आहे. अरिस्तो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा ओरिसा आणि अबॅकस स्टडी सेंटरचे आयोजक डॉ. ए एस  घोडके यांनी समृद्धी पिंगळेने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्वस्तरांमधून समृद्धी पिंगळेचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा