Subscribe Us

header ads

तुलसी कॉलेज मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा

बीड स्पीड न्यूज 

बीड(प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.४५ वाजता ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य डि.जी.निकाळजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताने प्रजासत्ताक दिनाची सांगता झाली. कोरोना महामारीच्या अनुषंगाने विद्यार्थी उपस्थित नव्हते मात्र ऑनलाईन पद्धतीने गुगल मीट या ॲप वर विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय दिन आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.घटना निर्मितीला २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले. संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. हे संविधान भारताने लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारले या दिवशी देशभरात ध्वजारोहण करून त्याला मानवंदना दिली जाते,भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते, हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे प्रजासत्ताक दिन साजरा करून देशा प्रती आदर व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रा.योगिता लांडगे, प्रा.गीतांजली कांबळे, प्रा.प्राची पाठक, प्रा.शिल्पा बोराडे, प्रा.स्वाती साबळे, प्रा.डॉ.भाग्यश्री पवार, प्रा.अंकुश सुर्वे,प्रा.विवेक जोगदंड,प्रा.भारत उघडे, ,प्रा.किशोर वाघमारे, , प्रा.समीर मिर्झा, प्रा.सुरज वक्ते, प्रा.राहुल सोनवणे,प्रा.प्रकाश ढोकणे,बबन पांचाळ,भाग्यविधाता साळवे,संजय धुरंधरे लिपिक प्रवीण रंगदळ,सुनीता साळुंके,शिपाई सुदर्शना वीर ,विजय नागरगोजे,आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा