Subscribe Us

header ads

एसआयओ बीड च्या वतीने हज हाऊस UPSC अभ्यास केंद्र संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

बीड स्पीड न्यूज 


एसआयओ बीड च्या वतीने हज हाऊस UPSC अभ्यास केंद्र संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

बीड ( प्रतिनिधि) :- हज हाऊसच्या वतीने UPSC निवासी प्रशिक्षण संस्थेत करण्यात आलेले अनावश्यक बदल रद्द कारावेत यासाठी आज २६ जानेवारी २०२२ रोजी एसआयओ बीड च्या वतीने धनंजय मुंडे (मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य) यांना निवेदन देण्यात आले .या वर  सविस्तर माहिती अशी आहे की 1)हज हाऊस निवासी प्रशिक्षण संस्थेत 200 विद्यार्थ्यांची क्षमता असुनही केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे.राहीलेल्या 100 विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करुन मंजुरी द्यावी. 2)मेन्स परिक्षा लिहणारे ज्या 37 सीनीअर विद्यार्थ्यांना हज हाऊस सोडण्याचे आदेश दिले होते त्यातील जे विद्यार्थी मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. 3) मेरीट बेसीस पुर्व परिक्षार्थींना किमान 3 वर्षाचा कालावधी मिळावा .4) पुर्वी हज हाऊसच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मेस सवलत -सबसिडी बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू करण्यात यावी. तसे ही मुंबई हज हाऊस च्या इमारतीत हज काळातील एक महिनाच वर्दळ असते आणि वर्षाचे उर्वरित 11 महिने ही इमारत मोकळी असते. 2006 साली मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक - आर्थिक - शैक्षणिक स्थितीची माहिती देणारा सचर समिती अहवाल प्रकाशित झाला . यात मुस्लिम समुदायातील उमेदवार IAS , IPS, IFS , IRS सारख्या केंद्रीय शासकीय सेवेत कमी असल्याचे निदर्शनास आले , म्हणून मुस्लिम समुदायातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेतील टक्का वाढावा या उद्देशाने मुस्लिम अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हज हाऊस येथे 2009 साली यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यात आली. आणि उर्वरित 11 महिन्यात या इमारतीच्या 18 मजल्यांपैकी 3 मजल्यांमध्ये निवासी प्रशिक्षण सुरू झाले.या वेळी एसआयओ बीड शहराध्यक्ष सय्यद खीझर, मुजम्मिल हनगी, सैफ उर रहेमान , मोहम्मद अली , मोहम्मद उमर, अन्सारी जुननुरेन, लुखमान फरूखी (एमआयएम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष) उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा