Subscribe Us

header ads

हरिनाम सप्ताह घेयचा की नाही या कारणावरून राडा; महिला सरपंचाच्या डोक्याला लावली पिस्तूल! ६ जणांवर गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


गेवराई_ कोविडची वाढती रुग्णसंख्या व ओमायक्रॉनमुळे आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने होणारा हरिनाम सप्ताह घ्यायचा किंवा नाही, यासाठीच्या बैठकीतच वाद उफाळून आला. ही घटना तालुक्यातील बोरगाव चकला येथे १५ जानेवारी रोजी घडली. यावेळी महिला सरपंचाच्या डोक्याला पिस्तूल लावली, या आरोपावरुन सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.छबूबाई ज्ञानोबा राख (६७) या बोरगाव चकला गावच्या सरपंच आहेत. हरिनाम सप्ताहबाबत १५ रोजी गावकऱ्यांची  बैठक बालावली होती. दादासाहेब शहादेव राख याने सप्ताह आम्ही घेणार आहोत, असे म्हणत तुम्ही कोण आहात, असे म्हणून सरपंचांचा अवमान केला. यावेळी त्याने शिवीगाळ सुरु केली. छबूबाई यांनी शिवीगाळ का करतो, असे म्हटल्यावर त्याने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. त्यानंतर डोक्याला गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी  दिली . छबूबाई यांचा पुतण्या प्रवीण याच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. दादासाहेब राखसह शहादेव भानुदास राख, नागेश रामराव राख, रामराव एकनाथ राख, ज्ञानेश्वर किसन राख, उद्धव रघुनाथ खेडकर यांच्यावर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी उपनिरीक्षक दिगंबर पवार तपास करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा