Subscribe Us

header ads

बीडमध्ये आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपयांचा विकास कामास सुरुवात जनतेचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी प्रेरणा देतात -आ.क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 

बीडमध्ये आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपयांचा विकास कामास सुरुवात
जनतेचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी प्रेरणा देतात -आ.क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):- मागील अनेक वर्षापासून बीड शहराचा विकास हा फक्त कागदोपत्री होत होता. निवडणुकीत तुम्ही मला आशिर्वाद दिले. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता आता मतदारसंघात करत आहे. तुमचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी मला प्रेरणा देत असल्याचे सांगत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील विविध ठिकाणी 2 कोटी 10 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.

बीड शहरातील प्रभाग क्र.2 मधील सिमेंट काँक्रेट रस्ता, नाली बांधकाम याच वार्डातील अन्य दोन ठिकाणी सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम त्याचबरोबर प्रभाग क्र.6, प्रभाग क्र.7,8 मधील सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचा शुभारंभ आज सकाळी आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्याचे अल्पसंख्यांक निरीक्षक सलीम सारंग यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. बीड शहरातील प्रभाग क्रमांक 02 मध्ये 

संजय पाटील ते हरीश कुकडेजा यांचे घर व नंदकिशोर आणेराव ते बबन राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 58 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 02 मध्ये गणेश बागडे ते डॉक्टर पी.के.कुलकर्णी  यांचे घर, राजू गोरे ते समेल अशोक यांचे घर व वर्धमान देवघरे ते मिथुन नगरे यांच्या घरापर्यंत सह्योग्नगर भाग सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 28 लक्ष 11 हजार रुपये, प्रभाग क्रमांक 02 मध्ये नितीन सवई ते सत्यनारायण कासार यांचे घर व प्रदीप रोड ते सुरेश नवले यांच्या घरापर्यंत (सह्योगनगर भाग) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 35 लक्ष 50 हजार रुपये, प्रभाग 

क्रमांक 02 मधील उन्हाळे हॉस्पिटलमागील बाजू ते फुलाई  नगरपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 20 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 06 मधील नवनाथ खंडागळे ते हुसेन  बागवान व जुबेर खान ते सय्यद सलीम व बुराण खान ते ऍड. मिर्झा बेग यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 07 मधील गजानन दोडके ते अब्दुल गणी इनामदार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 15 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 08 मधील 

शेख परवेज ते निसार अन्सारी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रुपयांचा सोमवार दि.17 जानेवारी 2021 रोजी आ.संदिप क्षीरसागर यांच्या हस्ते तर माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे अल्पसंख्यांकांचे राज्याचे निरीक्षक सलीम सारंग यांच्या उपस्थित करण्यात आला.यावेळी आ.क्षीरसागर म्हणाले की, पुर्वी बीड शहरातला विकास केवळ कागदोपत्री होत असायचा. शासनाकडून निधी यायचा मात्र तो प्रत्यक्षात खर्च केला जात नव्हता. निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिले. 

त्यावेळी मी जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. तुमच्या आशिर्वादामुळे मला नेहमी मतदारसंघातील व शहरातील विकास कामे करण्यासाठी प्रेरणा मिळते, असे या वेळी आ.क्षीरसागर यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा