Subscribe Us

header ads

तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन च्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

बीड स्पीड न्यूज 

तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन च्या वतीने
सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण


बीड(प्रतिनिधी):- सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीडच्या वतीने 0३ जानेवारी 2022 रोजी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, सभागृह बीड येथे करण्यात आले होते.यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रदीप रोडे( अध्यक्ष, देवगिरी प्रतिष्ठान बीड) तर उद्घाटक मा.उत्तम पवार (अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ, बीड), प्रमुख अतिथी  प्रा. ज्ञानदेव काशीद प्रा. शरद सदाफुले, प्रा. श्रीराम जाधव प्रा. बाळासाहेब जाधव, प्राचार्य, डी.जी.निकाळजे, प्राचार्य,अश्विनी बेद्रे, प्राचार्य, उमा जगतकर आदींसह उपस्थित होते.या सपर्धेला वरिष्ठ गट परीक्षक म्हणून प्रा.बाळासाहेब जाधव,प्रा.राम गव्हाणे, प्रा.ज्ञानदेव काशीद तर कनिष्ठ गट परीक्षक म्हणून प्रा.शरद सदाफुले, प्रा. श्रीराम जाधव, प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांची उपस्थिती होती. सदरील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत
गट: आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे विषय सावित्रीमाई फुले यांचे साहित्यिक योगदान, सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांचे आदर्श दांपत्य जीवन, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले हे विषय होते. या स्पर्धेत  प्रथम पारितोषिक १५०० रुपये तुरुकमारे प्रीती( महाराणी ताराबाई महाविद्यालय,वडवणी) हिने पटकाविले तर  द्वितीय १००० रुपये टेकाळे आदित्य(चंपावती विद्यालय,बीड), तृतीय पारितोषिक ७०० रुपये गायकवाड अंजली(गजानन ज्युनियर कॉलेज,राजुरी) हिने पटकाविले आहे तर गट: पदवी ते पदव्युत्तर चे विषय सावित्रीमाई फुले खऱ्या स्त्री-उद्धारक, महिला मुक्तीदात्या सावित्रीमाई फुले,सावित्रीमाई फुले यांचे साहित्य, समाज आणि सांस्कृतिक कर्तुत्व हे विषय होते यात प्रथम पारितोषिक २५०० रुपये वैष्णवी कोकाटे(प्रमिलादेवी कॉलेज),हिने पटकाविले आहे तर द्वितीय १५०० रुपये ओम जाधव(बलभीम महाविद्यालय,बीड), तृतीय १००० रुपये पारितोषिक धुताडमल पुनम( के.एस.के.महाविद्यालय,बीड) हिने पटकाविले आहे. या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणारे परशुराम मुरलीधर केजभट यांना माननीय उत्तम पवार (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ) यांच्यावतीने रोख रक्कम 1500 रुपये बक्षीस देण्यात आले. विजयेत्यांचा सावित्रीमाई फुले करंडक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सदरील जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत ७२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीडच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे, प्रा.विद्या अवघडे,प्रा.प्रियंका बचुटे,  प्रा.श्रद्धा डाके,प्रा.रसिका बाहेती,प्रा.धनश्री सांगोले, प्रा.पायल राठोड, प्रा.सुदर्मा सावजी, स्वप्निल साळवे, सरडे सर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका बाहेती यांनी केले तर आभार प्रा. अंकुश कोरडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा