Subscribe Us

header ads

आंदोलक महिलांना झाडावरुन खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले.

बीड स्पीड न्यूज 


बीड 26 जानेवारी_  बीडमध्ये सफाई कामगार महिलांनी थेट झाडावर चढून आंदोलन केलं. त्यांना गेल्या काही दिवसांपासून वेतन मिळालेलं नाही. ते वेतन मिळावं यासाठी दोन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडांवर चढून आंदोलन केलं. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांना झाडावर चढून आंदोलन करताना बघून त्यांना धक्काच बसला. धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेतली.या भेटीदरम्यान आंदोलन प्रमुखावर धनंजय मुंडे चांगलेच संतापले. धनंजय मुंडे आणि आमदाार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलक महिलांना झाडावरुन खाली उतरण्याची विनंती केली. विशेष म्हणजे महिलांची समजूत काढण्यासाठी, त्यांनी खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले. आमदार क्षीरसागर यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्या आहेत. या महिलांचा वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलं.बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिला कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे यापूर्वी देखील या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन केलं होतं. पण त्यांच्या आंदोलनाची फारसी दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांनी आज पुन्हा झाडावर चढून आंदोलन केल्याने प्रशासना मध्ये एकच तारांबळ उडाली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा