Subscribe Us

header ads

कार अपघातात नायब तहसीलदार गणेश सरोदे गंभीर जखमी

बीड स्पीड न्यूज 


कार अपघातात नायब तहसीलदार गणेश सरोदे गंभीर जखमी

अंबाजोगाई_अंबाजोगाई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार गणेश सरोदे हे आज बुधवारी (दि.26) सकाळी झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झाले. सकाळी अंबाजोगाई येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते स्वतःच्या MH.24.V.505 या कारमधून लातूरला निघाले होते. वाटेत सायगाव जवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार 3 ते 4 वेळेस पलटी झाली. सुदैवाने त्याच वेळी त्यांच्या कारच्या पाठीमागे अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची जीप होती. पोलिसांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या सरोदे यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांच्याकडून अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार बिपीन पाटील यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, सरोदे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा