Subscribe Us

header ads

महेदवीया दायरा कब्रस्तान च्या मोकळ्या जागेवरील झाड तोडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न ! कब्रस्तान कमेटी ने केली कारवाई करण्याची मागणी

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) - शहरातील महेदवीया जमाअ्त चे मोमीनपुरा भागात मोमीनपुरा बायपास रोड लगत दायरा कब्रस्तान आहे. कब्रस्तान च्या जागेवरील बाभळीचे झाड तोडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कब्रस्तान कमेटीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, वन अधिकारी आणि पेठ बीड पोलिस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारी निवेदनातून केली आहे.याविषयी दिलेल्या तक्रारी निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील मोमीनपुरा भागात मोमीनपुरा बायपास लगत असलेल्या महेदवीया जमाअ्त चे दायरा कब्रस्तान जवळपास ४५० वर्षांपासून आहे. कब्रस्तान च्या पश्चिम बाजूस मोमीनपुरा बायपासच्या मुख्य रस्त्यालगत कब्रस्तान ची मोठी मोकळी सहन जागा आहे. तसेच कब्रस्तानच्या विहिरीचीही मोठी जागा पडीक आहे. विहिरीच्या जागेवर एक आणि त्याच्याच बाजूला एक असे दोन मोठे वेड्या बाभळीचे झाड होते. त्यापैकी काही महिन्यांपूर्वी अज्ञाताने विहिरीच्या जागेवरील एक मोठे झाड रातोरात कापून टाकले व त्या झाडाचा तिथे मागमूसही ठेवला नव्हता. याला काही महिने उलटत नाही तोच विहिरीच्या जागेच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या झाडाला सुद्धा काल दिनांक १० जानेवारी २०२२ सोमवार रोजी दुपारी साधारण ०१:४५ मिनिटाच्या सुमारास अज्ञाताने तोडले. यामुळे घटनास्थळी जाऊन पाहिले असता झाड पूर्णतः जमिनीवर आडवे पडलेले होते. विशेष म्हणजे ०९ जानेवारी पर्यंत सदरील झाड चांगले दणकट होते. ते  झाड तोडण्यासाठी त्यावर करवत किंवा कुऱ्हाडीचा वापर न करता जेसीबी यंत्राचा वापर करून त्याच्या फटक्याने अगोदर झाड पाडण्यात आले नंतर इतर अवजारांचा उपयोग करून पाडलेल्या झाडाच्या लाकडांचा ढिगार लावण्यात आल्याचे प्रत्यक्ष स्थिती वरून दिसून येते. तुटलेल्या झाडाच्या खोडा जवळ लाकडाच्या ढिगारासह तीन कुऱ्हाड, कुऱ्हाडीला धार लावायचा एक दगड, एक धारदार विळा लावलेला बांबू आणि विहिरीच्या जागेच्या बाजूला असलेल्या समशेर इनामदार या भंगार व्यापाऱ्याच्या दुकानावरून विद्युत पुरवठा घेतलेला लांबलचक वायर, बटन, पिन, फ्यूज, आदी इलेक्ट्रिकल साहित्यासह विद्युत पुरवठा करण्यात आलेले एक-दोन नव्हे तर तीन छोटे-छोटे बोर्ड दृष्टीस पडले. ही बाब पेठ बीड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले ए.पी.आय. दासरवाड साहेबांना भ्रमणध्वनीवरून सांगितली असता त्यांनी कर्तव्यावर असलेले उबाळे नामक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठविले. पोलीस कर्मचारी उबाळेंनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि अज्ञात इसमाने  झाड तोडण्याकरिता  वापरलेले व वर उल्लेख केलेले सर्व अवजारे आणि साहित्य जप्त करून नेले आहे. तरी कब्रस्तान च्या जागेवरील एक-एक करत बाभळीचे दोन्ही झाड तोडून कब्रस्तान च्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलीस अधीक्षक साहेबांसह प्रशासनातील चारही अधिकारींनी कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी ने दिलेल्या तक्रारी निवेदनातून केली आहे. निवेदनावर कब्रस्तान कमेटीचे पदाधिकारी आणि सदस्यांची नावे व सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा