Subscribe Us

header ads

कुक्कडगाव ते पिंपळगाव या रस्त्याचे काम दोन वर्षापासून बंद

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


कुक्कडगाव ते पिंपळगाव या रस्त्याचे काम दोन वर्षापासून बंद



वाकनाथपुर प्रतिनिधी_ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कोणतेही अधिकारी लक्ष देत नाही ग्रामीण भागात कित्येक गावात डांबरी रस्ता नाही काही गावाला डांबरी रस्ता मंजुर होऊन देखील त्या रस्त्याचे काम लवकर होत नाही. गुत्तेदार रोड चे काम चालु करतात खडी मुरून टाकतात आणि काम बंद करतात अशातच बीड तालुक्यातील कुक्कडगाव ते पिंपळगाव हा सहा ते सात किलोमीटरचा रस्ता दोन वर्षा पासुन खडी आणि मुरून टाकून बंद केला आहे. हा रस्ता दोन वर्षा पासुन बंद असुन देखील कोणतेही अधिकारी या रस्त्याचे काम बंद का आहे. या कडे लक्ष देत नाहीत या रस्त्यावरची खडी 

उघडी पडल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. तसेच याचं भागातील वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा हा पाच किलोमीटरचा रस्ता देखील दोन वर्ष उलटुन गेली तरी ही या रस्त्याला आणखीन डांबर बघायला देखील टाकले नाही या रस्त्यावर देखील खडी आणि मुरूम टाकून काम बंद केले आहे. या रस्त्याचे काम दोन वर्षा पासुन बंद का आहे. याची वरिष्ठ अधिकारी यांनी लवकरात लवकर चौकशी करून लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावेत अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा