Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्याला मिळाले आणखी 5 उपजिल्हाधिकारी व 2 कार्यकारी अभियंते

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्ह्याला मिळाले आणखी 5 उपजिल्हाधिकारी व 2 कार्यकारी अभियंते

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड (दि. 11) - : उपजिल्हाधिकारी दर्जाच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना महसुली पदस्थापना देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार या आदेशाद्वारे बीड जिल्ह्यास 5 उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी मिळाले आहेत.तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदोन्नती वरून पदस्थापना अंतर्गत बीड जिल्ह्यात 2 कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी मिळाले असून त्यांना जिल्ह्यातील रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात येणार आहे.एकीकडे जिल्ह्यात अधिकारी मिळत नाहीत वगैरे अशा चर्चा काही मंडळी जाणीवपूर्वक करत असताना बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांची इनकमिंग मात्र सातत्याने सुरू आहे.प्राप्त आदेशानुसार श्री विश्वास शिरसाठ - भूसंपादन अधिकारी  अंबाजोगाई या रिक्त पदावर, ओंकार देशमुख - जिल्हा पुरवठा अधिकारी बीड या रिक्त पदावर, दयानंद जगताप - उपजिल्हाधिकारी सामान्य बीड या रिक्त पदावर, श्रीमती प्रियांका पाटील - उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना बीड या रिक्त पदावर तसेच प्रमोद कुदळे - उपविभागीय अधिकारी पाटोदा या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचबरोबर श्री प्रवीण मार्कंडेय यांची सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 बीड येथे व श्री विलास गपाट यांना सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 बीड येथे पदोन्नती ने रिक्त पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील विविध महत्वाच्या पदांवरील प्रभारी राज याद्वारे संपुष्टात आले असून, या सर्व महत्वाच्या विभागांना आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.बीड जिल्ह्यातील अधिकारी वर्गाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत, शासन आणि प्रशासन मिळून जनहीतार्थ काम करत राहू, असे यानिमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तांत्रिक अडचणी व इतर काही कारणांमुळे पूर्वीच्या ठिकाणी असलेले पदभार यामुळे अधिकारी लवकरच बीड जिल्ह्यात आपला पदभार येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा