Subscribe Us

header ads

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात;बीड जिल्‍हा परिषदेचे दोन शिक्षक निलंबित;

बीड स्पीड न्यूज 


आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात;बीड जिल्‍हा परिषदेचे दोन शिक्षक निलंबित; 


बीड _ आरोग्य विभागातील गट क आणि गट ड च्या भरती परिक्षेत गैरप्रकार झाला होता. या प्रकरणात बीड जिल्हा परिषदेत कार्यरत दोन शिक्षकांनाही काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. त्‍यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. अखेर  सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांनाही निलंबीत करण्याचे आदेश दिले.बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे कार्यरत असलेला शिक्षक (उद्धव प्रल्हाद नागरगोजे) व काकडहिरा येथील शाळेवर कार्यरत असलेला (विजय नागरगोजे) या दोघांना आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात सहभाग होता. पुणे सायबर विभाग यांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले.हे दोघेही सध्या पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील आणखी किती लोकांचा सहभाग आहे. याबाबतची माहिती घेतली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा