Subscribe Us

header ads

शालेय शिक्षण घेतानाच शेख अरख़म हाफ़िज़ ए क़ुरआन बनला !

बीड स्पीड न्यूज 

शालेय शिक्षण घेतानाच शेख अरख़म हाफ़िज़ ए क़ुरआन बनला ! 

बीड (प्रतिनिधी) - शहरातील जव्हेरी गल्ली भागात राहणारे सहशिक्षक एस.एम. इसा यांचा मुलगा तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा पुतण्या शेख अरख़म हा शालेय शिक्षण सुरु असतानाच क़ुरआन मुखपाठ करून हाफ़िज़ ए क़ुरआन बनल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शेख अरख़म चे वडील एस. एम. ईसा पेशाने सहशिक्षक असून ते मराठी माध्यमाच्या शाळेत परभणी जिल्हा परिषदेत कर्तव्यरत आहेत. अरख़म सध्या इयत्ता ११ वी मध्ये शालेय शिक्षण घेत असून त्याने शालेय शिक्षण घेताघेताच सन २०१७ मध्ये क़ुरआन मुखपाठ (हिफ़्ज़) करण्याकरिता मदरसा महादुल उलूम, परभणी येथे सुरुवात केली होती आणि काही दिवसांपूर्वी दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी त्याने संपूर्ण क़ुरआन हिफ़्ज़ (मुखपाठ) केला. अरख़म शालेय शिक्षणात ही हुशार असून त्याने सन २०२१ साली विशेष प्रावीण्यासह इयत्ता १० वी मध्ये घवघवीत यश मिळविले होते. शालेय शिक्षण तसेच धार्मिक शिक्षणात अरख़म ने प्राप्त केलेल्या या दुहेरी यशाबद्दल त्याच्यावर बीड व परभणी अशा दोन्ही ठिकाणी समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याने यापुढेही असेच उज्ज्वल यश मिळवीत राहावे. अशा शुभेच्छा दिल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा