Subscribe Us

header ads

प्रभाग 4 मधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर विकास कामे सुरु न केल्यास 20 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन

बीड स्पीड न्यूज 


प्रभाग 4 मधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर विकास कामे सुरु न केल्यास 20 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियात्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्याची नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांची मागणी

बीड ( प्रतिनिधी) 11 जानेवारी बीड नगरपरिषदे मार्फत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2020/2021 मधील नागरिकांच्या व सन्माननीय सदस्यांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट रस्ते,व नाल्याची कामे मंजूर करण्यात आली असून प्रभाग क्र 4 मधील 1,नागोबा गल्ली येथील योगेश ताटे ते सार्वजनिक स्वच्छालया पर्यंतचा मुख्य रस्ता,2,अजिंक्य चांदणे यांच्या घरापासून ते मातोश्री मंगल कार्यालया पर्यंत चा रस्ता, 3,रेगुडे यांचे किराणा दुकान ते शिंदे, तोतला गिरणी रस्ता पर्यंत चा रस्ता,4,आसाराम जोगदंड यांचे घरापासुन ते उत्तम जोगदंड ते कालिदास जोगदंड यांचे घरापर्यंत चा रस्ता, 5,चंद्रकांत कदम यांचे घरापासुन ते डॉ आंबेडकर सभागृह पर्यंत रस्ता 6,वीरशैव कॉलनी येथील शिवा भुरे ते सम्राट अशोक बुद्ध विहारा पर्यंत रस्ता,7,रमाई कॉलनी येथील हिरामन गायकवाड यांचे घरापासुन ते कांबळे यांचे घरापर्यंत चा रस्ता असे अनुक्रमे विकास कामे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी विकास योजेनेते समाविष्ट असून सदर योजनेचा निधी दुर्दैवाने बीड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीनीं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने मंजूर कामे रखडली असून सदर कामांची निविदा तसेच कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन महिन्याचा कालावधी लोटला तरी देखील प्रत्यक्षात कामे सुरु केली नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियातां   जाणीवपूर्वक मागासवर्गीयांच्या वस्त्यावर दुर्लक्ष करत असून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सांगन्यावरून मागासवर्गीयांच्या वस्त्या विकासापासुन वंचीत ठेवण्याचा कावा करत आहेत  आमच्या प्रभागाला मुदाम लक्ष केलं जातं असून हा आमच्यावर अन्याय केला जात आहे मागासवर्गीयांच्या वस्त्यात विकास कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियांत्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात यावी अशा अश्याची मागणी करत प्रभागातील मंजूर विकास कामे 20 जानेवारी पर्यंत सुरु न केल्यास प्रभागातील नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशार नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांचे सह शिष्टमंडळानी आज रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे
याप्रसंगी अशोक कांबळे,मंगेश जोगदंड,महादेव वंजारे, लक्ष्मण जोगदंड, जानू जोगदंड, राजेश कोकाटे, गोरख जोगदंड, सचिन जाधव सह आदी उपस्थिती होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा