Subscribe Us

header ads

साई स्किन हॉस्पिटलचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन; रूग्णांच्या चेहर्‍यावरचे समाधान हेच डॉक्टरांचे यश-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे

बीड स्पीड न्यूज 

साई स्किन हॉस्पिटलचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन
रूग्णांच्या चेहर्‍यावरचे समाधान हेच डॉक्टरांचे यश-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या त्वचा रोग, केस विकार व लेजर तज्ञ असलेल्या साई स्किन हॉस्पिटलचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. रूग्णालयात आल्यानंतर उपचार घेवून परत येणार्‍या रूग्णांच्या चेहर्‍यावरचं समाधान हेच डॉक्टरांचं मोठं यश असतं. त्वचा रोग, केस विकास व लेझर या संबंधित रूग्णांना साई स्किन हॉस्पिटलचा मोठा आधार मिळेल असे प्रतिपादन बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळष यांनी केले आहे.
गुरूवार दि.20 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ, महिला कॉलेज रोड लोटस हॉस्पिटलसमोर डॉ.श्रीकांत खोसे, डॉ.सुषमा खोसे, डॉ.स्वप्निल देवगुडे यांच्या साई स्किन हॉस्पिटल व ओंकार मेडिकलचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिव्हील सर्जन डॉ.सुरेश 

साबळे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, डॉ.बाबु जोगदंड, डॉ.नरेंद्र जोगदंड, युवराज कोकाटे, राधाकिसन नागरगोजे, अ‍ॅड.राम काशीद, अ‍ॅड.राजेंद्र भोरे, अरूण दादा बरकसे, डॉ.अमित काळे, डॉ.आशिष गर्जे, डॉ.विजय घोळवे, डॉ.विवेकानंद ढाकणे, दिलीप विघ्ने, अ‍ॅड.संतोष ढाकणे, महादेव जायभाय यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे खोसे व देवगुडे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्वचा रोग व केस विकार तसेच लेझर या संबंधित रूग्णांना साई स्किन हॉस्पिटलच्या माध्यमातून वेळेत आणि चांगले उपचार मिळावेत, रूग्णांच्या चेहर्‍यावरचं समाधान हेच या हॉस्पिटलचे यश असेल असे प्रतिपादन यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या वाटचाली बाबत शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा