Subscribe Us

header ads

अंबिका चौक ते करपरा नदी सहा कोटी रूपयांच्या सिमेंट,रस्ता नाली बांधकामाचा शुभारंभ बीड शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आ.संदिप क्षीरसागरांची ग्वाही

बीड स्पीड न्यूज 

अंबिका चौक ते करपरा नदी सहा कोटी रूपयांच्या सिमेंट,रस्ता नाली बांधकामाचा शुभारंभ
बीड शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आ.संदिप क्षीरसागरांची ग्वाही



बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पात निधी मंजुर करून घेत या कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपुजन केले. अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामास आता 

सुरूवात झाली असून यापुढे बीड शहराच्या व ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी यावेळी दिली आहे.शुक्रवार दि.21 जानेवारी 2022 रोजी शाहुनगर भागातील प्रभाग क्र.1 मधील अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदीमध्ये असलेल्या सहा कोटी रूपयांच्या सिमेंट रस्ता नाली व प्रभाग क्र.12 मध्ये 20 लक्ष रूपयांच्या रस्ता नालीचे व गोरेवस्ती येथील 

अमृत अटल योजने अंतर्गत पाईपलाईन कामाचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांची विशेष उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासून अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंतचा रस्ता करण्यात यावा अशी मागणी शहरातील नागरिकांसह या भागाशी निगडीत असणार्‍या ग्रामीण भागातील 

जनतेकडूनही होत होती. आता प्रत्यक्षात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून सदर काम सुरू झाले आहे. यापुढे मतदार संघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू, मतदार संघाचे रूप बदलण्यासाठी व विकास कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आपले आशिर्वाद कायम राहू द्या असे आवाहनही यावेळी जनतेला केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा