Subscribe Us

header ads

६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून!

बीड स्पीड न्यूज 

केज_ तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथील पारधी वस्तीवरील ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.नांदूरघाट येथून जवळच असलेल्या हंगेवाडी येथील पारधी वस्तीवर सखुबाई बन्सी शिंदे या महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी घटनास्थळावर धाव घेत घेतली.पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले आहे. घटनास्थळी पोलीस पथकातील कर्मचारी मेसे, भालेराव, शिवाजी शिनगारे, मतीन शेख हे तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा