Subscribe Us

header ads

जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; सुधारित आदेश जारी

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, आता ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने सुधारीत आदेशही काढले आहेत. या नवीन आदेशानुसार, ब्युटी पार्लरला आणि जिमला 50 टक्के क्षमतेने परवानगी असणार आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी जाता येणार आहे.राज्यात कोरोनाच कहर वाढल्याने राज्य शासनाकडून काल नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे, यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले. आदेशात जिम आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आज सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा