Subscribe Us

header ads

मणक्यातील ट्यूमरमुळे दोन्ही पाय निकामी झालेल्या युवकावर काकू-नाना हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; न्यूरोसर्जन डॉ.समीर शेख आणि त्यांच्या टीममुळे गरीब युवकाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

बीड स्पीड न्यूज 

मणक्यातील ट्यूमरमुळे दोन्ही पाय निकामी झालेल्या युवकावर काकू-नाना हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
न्यूरोसर्जन डॉ.समीर शेख आणि त्यांच्या टीममुळे गरीब युवकाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य


बीड (प्रतिनिधी):- दोन्ही पाय निकामी झाल्याने एका जागी अंथरुणावर खिळलेल्या युवकाच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने त्याचा उपचाराचा खर्च कसा करायचा असा प्रश्न घरच्या लोकांना पडला होता. त्यातच त्या युवकाला मणक्यातील ट्यूमर झाल्याचे स्पष्ट झाले. ऑपरेशनसाठी चार लाखाचा खर्च येत असल्याने आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने रुग्णाला औरंगाबाद येथून परत आणले. मात्र काकू - नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णाला ऍडमिट करताच अतिशय माफक दरात न्यूरॉसर्जन डॉ. समीर शेख व त्यांच्या टीमने त्या युवकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून बीड शहरातील गांधी नगर भागातील युवकाला जीवदान दिले. न्यूरो सर्जन डॉ. समीर शेख व त्यांच्या टीमने त्या युवकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि त्या गरीब कुटुंबातील युवकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आता तो रुग्ण स्वतःच्या पायावर चालत चेकअपसाठी येऊ लागला आहे. बीड शहरातील गांधी नगर भागातील मोलमजुरी करून खाणाऱ्या येथील एका युवकाला अचानक दोन्ही  पाय निकामी झाले. कमरेचा खालील भागाची  कुठलीही हालचाल होत नव्हती. अचानक आलेल्या संकटाला युवक व युवकाचे नातेवाईक घाबरून गेले होते. रुग्ण आजारी पडून दोन महिने आले परंतु योग्य रोगनिदान होत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये ते बीड शहरातील एका नामांकित हॉस्पिटमध्ये दाखवण्यासाठी गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना एमआरआय करण्यास सांगितले. त्यामध्ये मणक्यांमधील ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. त्यागाठी मुळे शिरेवर  दबाव पडत होता म्हणून पायाची हालचाल थांबली होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना औरंगाबाद येथे घेऊन जा बीडमध्ये कुठल्याही हॉस्पिटलला याचा इलाज होणार नाही असे खाजगी हॉस्पिटलकडून  सांगण्यात आले. त्यामुळे  रुग्णाच्या नातेवाईकांनी हालाखीच्या परिस्थितीमध्येही औरंगाबादला जाण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला दाखविले. त्यांना चार लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला व ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाला चालता येईलच अशी आम्ही खात्री देत नाहीत असेही सांगण्यात आले.  रुग्णाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने चार लाख रुपये खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये ते पुन्हा रुग्णाला घेऊन बीडला आले. बीडमधील समाजसेवक शेरखान सर व काजी तकिउद्दीन यांना ते भेटले. त्यांनी  काकू- नाना मेमोरियल हॉस्पिटल येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.समीर शेख यांना भेटण्यास सांगितले. डॉ. समीर शेख यांनी रुग्णाची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे नातेवाईकास सांगितले.  नातेवाईकांनी शस्त्रक्रिया तयारी दर्शवली आणि दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली.ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही पायाची हालचाल सुरू झाली. रुग्ण  दोन्ही पाय उचलू लागला. रुग्णाच्या नातेवाईकांना खूप आनंद झाला. अत्यंत महागडी शस्त्रक्रिया बीड जिल्ह्यामध्ये  प्रथमच माफक दरामध्ये करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी, भुलतज्ञ डॉ.श्रीकांत मोराळे व  न्यूरोअसिस्टंट , प्रणव सपकाळ, रावसाहेब गिरी, सचिन गाडे, गणेश गायकवाड. यांनी असिस्टंट म्हणून काम पाहिले, तसेच अतिदक्षता विभाग मधील डॉक्टर .अश्विनी बहिर, अशोक यादव, उत्कर्ष सोमवंशी, सोनाली शिंदे, दर्शन  रागीट, गजानन शेरकर आधी डॉक्टरांनी कठोर परिश्रम घेऊन रुग्णाची काळजी घेतली. त्यानंतर परिचारिकांच्या अथक  परिश्रमामुळे रुग्णाला बरे होण्यास मदत झाली. रुग्ण 30 दिवसानंतर स्वतःच्या पायावर  बाह्य रुग्ण  विभागात चालत आला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर स्वतःच्या पायावर चालत आलेला आनंद मावत नव्हता. डॉ.समीर शेख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून रुग्णाला नवीन जीवनदान दिले. याबद्दल न्यूरो सर्जन डॉ. समीर शेख व त्यांच्या संपूर्ण टीमचे काकू -नाना मेमोरियल हॉस्पिटलचे अध्यक्ष तथा बीड मतदार संघाचे विद्यमान आ. संदीपभैय्या क्षीरसागर ,  हॉस्पिटलचे संचालक डॉ.बालाजी जाधव, श्री.अजित वरपे व  वैद्यकीय संचालक डॉ.सचिन आंधळकर यांनी डॉ. समीर शेख यांचे  व  काकू -नाना मेमोरियल हॉस्पिटल आणि मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट व  संपूर्ण टीम यांचे मनस्वी अभिनंदन  केले.


बीड जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी

काकू -नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट बीडच्या माध्यमातून न्यूरो सर्जन  डॉ.समीर शेख यांनी इतिहास निर्माण केला. आता बीड जिल्ह्यातील जनतेसाठी न्यूरो व स्पाईन सर्जन म्हणून डॉ.समीर शेख हे  पहिले न्यूरो व स्पाईन सर्जन म्हणून बीडकरांना  लाभल्यामुळे आता बीड करांना औरंगाबाद पुणे येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. डॉ. शेख आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत अनेक गंभीर स्वरूपाच्या आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्यांच्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा