Subscribe Us

header ads

आपघातातील सात जणांना मोफत उपचार; डॉ.अनिल सानप व सहकार्‍यांचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 


आपघातातील सात जणांना मोफत उपचार;डॉ.अनिल सानप व सहकार्‍यांचा सत्कार


बीड दि.9 (प्रतिनिधी) कापसाचा टेम्पो पलटी होवून एकाचा जागीच मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना 3 जानेवारी 2022 रोजी गेवराई तालुक्यातील सुर्डी (बु्र.) येथे घडली. यामधील सर्व जखमींना बीड येथील लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे डॉ.अनिल सानप, त्यांचे सहकारी डॉक्टर आणि 

कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.दिनांक 3 जानेवारी रोजी सुर्डी बुद्रुक तालुका गेवराई येथे कापसाचा टेम्पो पलटी झाला. त्यात सात जण गंभीर जखमी झाले व एकाचा जागीच मृत्यू झाला. सदरील जखमींना बीड येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातात गोविंद लव्हाळे बाळू लव्हाळे, जालिंदर पटेकर, करण पटेकर, दत्तात्रय मोरे या सर्व रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देऊन दिनांक 8 जानेवारी रोजी सुट्टी देण्यात आली. रुग्णांचे नातेवाईक मारुती लव्हाळे  व विकास लव्हाळे यांनी डॉक्टर अनिल सानप डॉ. विश्‍वास गवते, डॉ चित्रसेन मिसाळ यांच्यासह कर्मचारी अशोक गायकवाड, संदीप आगलावे, श्रीराम राठोड, सुपरवायझर मोहसीन इनामदार व आरोग्यमित्र विकास राठोड, शुभम वडमारे आदींचा सत्कार करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा