Subscribe Us

header ads

कोरोना विषाणू (कोविड -19 ) प्रादुर्भाव नियंत्रणासाठी व उपाययोजना बाबत दिशानिर्देश

कोरोना विषाणू (कोविड -19 ) प्रादुर्भाव नियंत्रणासाठी

व उपाययोजनाबाबत दिशानिर्देश

 

 बीड, दि. 9,  (जि. मा. का.) :- महाराष्ट्र राज्यात कोविड -19 ओमायक्रॅान विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत असल्याने या संदर्भाने राज्यात उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत नियमावली व उपाययोजना लागू करण्यात आली आहे. त्या शासन आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील नागरी / ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा दंडधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राधाबिनोद शर्मा यांनी दिशानिर्देश दिले आहेत. शासन निर्देशाप्रमाणे कोविड 19 साथरोग संदर्भाने तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधित बाबींना बीड जिल्हा सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना कालावधी दि. 10 जानेवारी 2022 चे मध्यरात्री पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. या आदेशातील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देशांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक आहे.

आदेशातील बाबी व निर्देश पुढीलप्रमाणे -

जमावबंदी व संचार बंदी :

        सकाळ 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाचहून अधिक लोकांना जमाव बंदी करण्यात येत आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल.

शासकीय कार्यालयातील उपस्थिती :

कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखाचे लेखी परवानगी शिवाय कार्यालयात प्रवेशास मनाई असेल. शासकीय बैठकांकरिता ऑनलाईन व्हीसी सुविधेचा वापर करण्यात यावा. कार्यालयातील वा बाहेरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता ही बाब लागू असेल. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येवून शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कोविड अनुरुप पध्दतीचे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी करावी.  सर्व कार्यालयाचे प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायजर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.

खाजगी कार्यालयातील उपस्थिती :

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येवून शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. नियमित उपस्थितीच्या 50 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असू नये. त्यासाठी शक्यतो कार्यालयीन वेळा 24 तास करण्यात येवून कर्मचाऱ्यांचे डयुटी कालावधीमध्ये तशा प्रकारचे आवश्यक बदल करण्यात यावे, ज्यात त्यांच्या प्रवासाच्या वेळाचा विचार करण्यात यावा. तथापि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधांने आवश्यक नियोजन करण्यात यावे. कोविड-19 लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. तथापि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हावयाचे आहे, त्या करिता त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. कार्यालयामध्ये कोविड अनुरुप पध्दतीचे चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापन प्रमुख यांनी करावी. सर्व कार्यालयाचे प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायजर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.

विवाह कार्यक्रम :

 सामाजिक अंतर राखून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

अंत्यविधी :

 कमाल  20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

सामाजिक / धार्मिक / सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम  इत्यादी ठिकाणची  गर्दी बाबत :

         कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

शाळा / महाविद्यालये / कोचिंग क्लासेस :

        सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद असतील. तथापि इयत्ता 10 व 12 वीचे शैक्षणिक क्रियाकरिता संबंधित शिक्षण बोर्डचे वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाने आवश्यक कार्यवाही करावी.  वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासकीय बाबी व कार्यवाही नियमितपणे शिक्षकांकडून करण्यात याव्यात. शिक्षण विभाग, तंत्र व उच्च शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागांकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. या शिवाय सदर विभागांना इतर बाबी करिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.

ब्युटीसलून

            सदर ठिकाणी 50 टक्के  क्षमतेसह सुरु ठेवण्यासाठी मुभा असेल. दररोज रात्री 10 ते रात्री 7 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. कोविड अनुरुप वर्तन / निर्देश/ नियमांचे पुर्ण बंधन पाळण्यात यावे. केवळ पूर्ण लसीकरणक झालेल्या व्यक्तिंनाच सेवा देण्याची / वापरण्याची परवानगी असेल. मास्क काढता येणार नाही अशाच सेवा सुरु राहतील.

जीम / व्यायाम शाळा

            सदर ठिकाणी 50 टक्के  क्षमतेसह सुरु ठेवण्यासाठी मुभा असेल. दररोज रात्री 10 ते रात्री 7 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. कोविड अनुरुप वर्तन / निर्देश/ नियमांचे पुर्ण बंधन पाळण्यात यावे. केवळ पूर्ण लसीकरणक झालेल्या व्यक्तिंनाच सेवा देण्याची / वापरण्याची परवानगी असेल. मास्क काढता येणार नाही अशाच सेवा सुरु राहतील..

क्रीडा स्पर्धा इ. :

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्व नियोजित स्पर्धांना  खालील अटी व शर्ती नुसार परवानगी असेल. प्रेक्षकांना परवानगी नसेल. सर्व खेळाडू/ स्टाफ करिता बायो -बबल असेल. राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्पर्धा संदर्भात केंद्र शासनाचे निर्देश लागू असतील. प्रत्येक 3 दिवसाने आरटीपीसीआर/ रॅट चाचणी करणे बंधनकारक असेल. गाव/ शहर / तालुका/ जिल्हा स्तरावरील कोणत्याही स्वरुपाच्या क्रीडा स्पर्धांना पुर्णत: मनाई असेल.

मनोरंजनाची स्थळे जसे की उद्याने, बाग बगीचे/ पार्कस्, किल्ले प्रेक्षणीय स्थळे इ.

पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

शॉपिंग मॉल्स, बाजार संकुले :

 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मुभा असेल. तथापि सदर मॉल्सची एकूण क्षमता आणि ग्राहकांच्या संख्येबाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वाना स्पष्ट दिसेल, अशा ठळक पध्दतीने लावण्यात यावा. कोविड अनुरुप वर्तन / निर्देश/ नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. सदर ठिकाणी कोविड-19 रॅट चाचणी करिता बुथ/ किऑस्क उपलब्ध ठेवण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद असतील.

रेस्टॅरंट , उपहार गृह :

 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मुभा असेल. तथापि सदर रेस्टॅरंट, उपहार गृहाची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्या बाबत प्रवेशव्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वाना स्पष्ट दिसेल, अशा ठळक पध्दतीने लावण्यात यावा. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद असतील. पार्सल सुविधा/ होम डिलेवरी सुरु ठेवता येईल.

नाटयगृह, चित्रपटगृह इ.

 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मुभा असेल. तथापि सदर नाटयगृह, चित्रपटगृहाची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्या बाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वाना स्पष्ट दिसेल अशा ठळक पध्दतीने लावण्यात यावा. कोविड अनुरुप वर्तन / निर्देश/ नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद असतील.

आंतरराष्ट्रीय प्रवास

 केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे

देशांतर्गत प्रवास

महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वा प्रवासाचे 72 तासादरम्यानचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे. सदर बाब हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूकला लागू असेल. रस्ते मार्गांनी प्रवास करणारे वाहन चालक / क्लिनर्स / इतर स्टाफ यांनी सदर बाबींचे पूर्ण पालन करावे.

कार्गो सेवा- वाहतूक, उत्पादन सेवा, बांधकाम कार्ये इ. :

दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांकरिता सुरु असतील.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था : 

दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांकरिता नियमितपणे सुरु असतील.

केंद्रीय लोकसेवा आयोग / राज्य लोकसेवा आयोग/ वैधानिक संस्था/ सार्वजनिक संस्था इ. :

राष्ट्रीय पातळीवरून आयोजित होणाऱ्या सर्व परिक्षकांकरिता केंद्र शासनाच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर परिक्षकांकरिताचे प्रवेशपत्र हे अत्यावश्यक बाबी अंतर्गत वैध हालचालीस वैध पुरावा असेल. राज्य पातळीवरुन आयोजित होणाऱ्या परीक्षांसंदर्भात ज्या परीक्षांचे  ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत, अशा परीक्षा नियोजनाप्रमाणे घेता येतील. तथापि इतर सर्व परिक्षांकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल. सर्व परिक्षेदरम्यान कोविड अनुरुप वर्तन/ निर्देश/ नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा