Subscribe Us

header ads

द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने 'कैवल्यदिन' साजरा


बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःमुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे,पुणे.)

द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने 'कैवल्यदिन' साजरा

पुणेः   श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने नागपुर येथे ब्रम्हलीन संत रामसा खडेकार यांचा कैवल्यदिन साजरा करुन या दिनी गरीब महिलांना गृहोपयोगी वस्तु व धान्य देऊन सहकार्य केले.नागपुर येथील श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यामध्ये रोजगार दिवस,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे.आदी साह्य, मदतीचे उपक्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.अंजलीताई सुरेशराव अनासने ह्या समाजात राबवित असतात .जेणेकरुन समाजातील गरजु,होतकरु यांना लाभ मिळावा.हा त्यांचा हेतु असतो.दरवर्षी  ब्रम्हलीन संत श्री रामसा खडेकार यांचा कैवल्यदीन १५जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.यावर्षीही आयोजन केले.पण कोरोना प्रार्दुभाव व त्यामुळे असलेले निर्बंधाचे नियम पालन करुन छोटेखानी हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रारंभी सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ कवि व अध्यात्मिक लेखक स्व.रमेश दुसाने(पुणे),सामाजिक कार्यकर्ते स्व.विठ्ठलराव निगुसकर(डोंबिवली),जैन धर्माचे अध्यात्मिक गुरु स्व.नविनकुमार देसाई(अमरावती)यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यानंतर सौ.अंजलीताई अनासने यांनी त्यांचे वडील अमरावती वास्तव्यातील ब्रम्हलीन  संत रामसा खडेकार यांना आदरांजली वाहुन त्यांच्या अध्यात्मिक कार्याची याप्रसंगी माहिती देण्यात आली.या कार्यक्रमात यानिमित्त व संक्रातीच्या पावन पर्वावर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा दोन गरीब महिलांची व्यथा कथन करुन त्यांना एक महिण्याचे किराणा सामान,अन्नधान्य उदरनिर्वाहासाठी सहकार्य म्हणून  या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच संस्थेच्या वतीने वृध्दाश्रमास आर्थिक निधी देखील पाठविण्यात आला.कार्यक्रमात सर्व उपस्थितांना श्री विष्णुसहस्त्रनाम पुस्तिका व तीळगुळ भेट स्वरुपात देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रामुख्याने समाजातील मान्यवर व्यक्ती सुधाकरराव बैतुले ,ओंकारेश्वर गुरव, मधुकरराव बैतुले,अरविंद हाडे,सुरेशराव अनासने, संजय दोडके,सौ.मायाताई हाडे,सौ.रजनीताई चित्रे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार काव्यशैलीतुन अनिलजी मालोकर यांनी सुत्रसंचलन केले.शेवटी रुग्वेद न्युज चॕनेलचे संचालक दिनेश येवले यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा