Subscribe Us

header ads

परळीच्या कार्यकर्त्यांनी लोकशिक्षण आणि लोक जागृती साठी काम करावे- अँड. अजित देशमुख

बीड स्पीड न्यूज 

परळीच्या कार्यकर्त्यांनी लोकशिक्षण आणि लोक जागृती साठी काम करावे - अँड. अजित देशमुख

परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी लोकशिक्षण आणि लोकजागृती साठी मोठ्या प्रमाणात काम करावे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे काम तळागाळापर्यंत नेऊन लोकांना त्यांचे हक्क समजावून सांगावेत, असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी केले.जन आंदोलनाच्या पुनर्बांधणीच्या निमित्ताने देशमुख यांनी परळी मीरा कॉम्प्युटर्स, टावर जवळ, परळी या बालाजी गायकवाड यांच्या दुकानी बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के होते. तर परळी तालुका अध्यक्ष अँड. परमेश्वर गीते, धनंजय सोळंके, प्राध्यापक वाघमोडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले की, जन आंदोलनाचे काम बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू आहे. हे काम आणखी वाढविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के यांनी देखील कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावे ? याविषयी मार्गदर्शन करत जिल्ह्यात सर्वत्र पुनर्बांधणीची प्रक्रिया चालू आहे, असे सांगून कार्यकर्त्यांना चांगले काम करण्याचे सुचवले. परमेश्वर गित्ते यांनी देखील त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडून संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले.यावेळी शिवश्री देवराज महाराज लुगडे, सेवकराम जाधव, परळी येथील अँड. भूषण देशमुख, शेख अजमत, अण्णासाहेब सोळंके, पुरूषोत्तम तोतला, धर्मराज जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर गीते यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी गायकवाड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा