Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

निधी मंजूर झाल्याने बीड विधानसभा मतदारसंघाचा  विकास -आ.संदीप क्षीरसागर

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादांनी नेहमीच मोठा निधी दिला-पालकमंत्री धनंजय मुंडे

बीडमध्ये 100 कोटी 60 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपुजन, लोकार्पण सोहळा


बीड (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तीन महिन्यातच सर्वत्र कोरोनाचे संकट ओढवले. मात्र या परिस्थितीतही आम्ही सर्वांनी समन्वयाने काम केले. बीड जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामांसाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कायम आग्रही असतात. 

अगदी त्याचप्रमाणे बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर हे ही सातत्याने निधीची मागणी करून शहर आणि मतदारसंघाच्या विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करतात. आज या आमच्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच बीड मतदारसंघातील 100 कोटी 60 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचा 

शुभारंभ, उद्घाटन, भूमिपुजन आणि लोकार्पण होत आहे. आगामी काळातही बीड जिल्ह्यातील विकास कामांसाठी आम्ही कधीही निधी कमी पडू देणार नाहीत. बीड जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयामध्ये आता लवकरच एमआयआर, सिटीस्कॅन मशिन दिल्या जातील. तसेच बीड येथील जिल्हा रूग्णालयासाठी महात्मा फुले 

जीवनदायी योजनेतून जो निधी बचत झाला. त्यातून लवकरच कॅथलॅब दिला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तर लॉकडाऊनच्या काळापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच स्थलांतरीत झालेले 

86 हजार मजूर जिल्ह्यात पोहचू शकले. आताही विकासकामांसाठी सातत्याने निधी दिला जातो आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे कामगार मंडळाच्या स्थापनेनंतर 20 कोटींचा निधी सरकारने दिला.  नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा राज्याचा हिस्साही सरकारने दिला. जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र आणि गडांच्या 

विकासासाठीही विकासकामे होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांमुळे निधी मिळाला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड मतदारसंघाच्या विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी न मागता खूप सारा निधी दिला म्हणूनच मतदारसंघात आता खर्‍या अर्थाने कायापालट होत असून आणखी ज्या काही समस्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निधी द्याल अशी अपेक्षा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.बीड विधानसभा मतदारसंघातील 100 कोटी 60 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपुजन, लोकार्पण सोहळा मंगळवार दि.8 फेब्रुवारी 2022 रोजी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी बीड पं.स.च्या नुतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तसेच बीड तालुका क्रिडा संकुलाच्या जागेतील बॅडमिंटन हॉल, जीम हॉल व कार्यालय इमारतीचे भूमिपुजन तसेच बीड विश्रामगृहाचे नुतनीकरण, आयटीआय प्रशासकीय व 

कार्यशाळा इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन व्हर्चुअल उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री दत्तामामा भरणे, आ.विक्रम काळे यांची उपस्थिती होती तर बीड येथून कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संदीप क्षीरसागर, जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, बीड पं.स.च्या सभापती सारिका गवते, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जि.प.चे सीईओ अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, 

माजी आमदार सुनील धांडे, सय्यद सलीम, जनार्धन तुपे यांच्यसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच परळी वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होवून बीडमध्ये होत असलेल्या कामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. कोरोना संकटकाळातही राज्य सरकारने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेला. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला निधी पडू दिला नाही. त्यातूनच अनेक कामे पूर्णत्वास गेली आज बीडमधील विकासकामांचा शुभारंभ होतो आहे ही सर्व कामे दर्जेदार व्हावीत अशी माझी अपेक्षा आहे. कारण हा पैसा जनतेचा असतो, त्याचा उपयोग चांगला होणे अपेक्षित आहे. आगामी काळातही बीड जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून जो निधी बचत झाला. त्यातून 

बीडसाठी कॅथलॅब उपलब्ध करून देत आहोत तसेच एमआयआर मशिनसह सिटीस्कॅन मशिन जिल्हा आणि उपजिल्हा रूग्णालयांना उपलब्ध करून दिले जातील. सर्वसामान्यांचे आरोग्य चांगले ठेवणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे तरूण तडफदार नेते आहेत. त्यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमचे लोकप्रतिनिधी सातत्याने विकास कामांसाठी आग्रही असतात. बीड जिल्ह्याने सुरूवतीपासूनच साथ ि दली आहे. या जिल्ह्यातील विकासाची कामे मागे ठेवली जाणार नाहीत. ही पूर्ण झालेली कामे पाहण्यासाठी बीडला नक्की येईल. त्यासाठीचे निमंत्रण आजच स्विकारतो तसेच बीड शहर अमृत अटल पाणी पुरवठा योजना मार्गी लावली जाईल. मात्र जनतेलाही आर्थिक शिस्त लावण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. यावेळी ते म्हणाले, बीड विधानसभा मतदारसंघातील 100 कोटी 60 लक्ष रूपयांच्या विकासकामांचा निधी उपमुख्यमंत्री 

अजितदादा पवार यांनी मंजूर करून दिला. त्यामुळे आज अनेक विकासाची कामे प्रत्यक्षात पूर्णत्वाकडे जात आहेत. त्याबद्दल बीडकरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम अजितदादांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घ्यावयाचा होता. मात्र कोविडच्या नियमामुळे ऑनलाईन कार्यक्रम घ्यावा लागत आहे. बीड जिल्हा रूग्णालयासाठी सर्वसुविधा राज्य सरकारच्या प्रयत्नातून मंजूर झाल्या. तसेच ज. गत दोन वर्षात शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत आहेत. हा बदल बीडकरांना महाविकास आघाडीच्या सरकारमुळे दिसतो आहे. आता मागणी एकच आहे ती म्हणजे बीड नगर पालिकेकडून दहा दिवसाला पाणी पुरवठा होतो तो तीन दिवसांनी होणे अपेक्षित आहे. यासाठी अमृत अटल योजनेचे काम मार्गी लावले जावे अशी मागणी त्यांनी केली.या प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. हे दोन्ही नेते आपल्या विभागाच्या विकासासाठी पाठपुरावा करत राहतात. बीडमध्ये 

संदीपभैय्यांसारखा तरूण आमदार लोकांचे प्रश्न छान पद्धतीने सोडवत आहे तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. जिल्ह्यातील जनतेने या कर्तबगार नेत्यांच्या पाठिशी राहावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आ.संदीप भैय्यांनी आमदारकीच्या दोन वर्षातच शंभर कोटींचा निधी आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करून घेतला हे खूपच कौतुकास्पद आहे. या विकासकामातून बीड पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळाही पार पडत आहे. निधी मंजुरीसाठी आ.संदीपभैय्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. आज पं.स.च्या इमारतीचे लोकार्पण झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो तसेच बीड पं.स.ची ही नुतन इमारत 

सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्याचे, त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याचे माध्यम ठरावे, संदीप भैय्या हे लोकप्रिय आमदार म्हणून यशस्वी होत असल्याचे गौरवोदगारही त्यांनी काढले.यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांनी नेहमीच विशेष लक्ष दिले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाले. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक लोक कारखान्यावर होते. अजितदादांनी केलेल्या मदतीमुळे 86 हजार मजुरांना जिल्ह्यात आणता आले. डिपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी अधिकचा निधी मिळाला. गत दोन वर्षात हा निधी आम्हाला कोविडसाठी खर्च करावा लागला. मात्र याही स्थितीत जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना आवश्यक ती सामुग्री देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील विकास कामांचा दर्जा आता सुधारतो आहे. दर्जेदार कामे केली जात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी बीडला येवून ही कामे नक्की पाहावीत आणि या कामाचा उच्च दर्जा पाहून आमच्या पाठिवर कौतुकाची थाप टाकावी इतकीच आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. बीड जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादांनी नेहमीच भरभरून विकास निधी दिला आहे यापुढे जिल्ह्यातील विकास यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या ओंजळीने निधी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी मानले.


बीडला अत्याधुनिक कॅथलॅब मिळणार-राजेश टोपे


बीडमध्ये जिल्हा रूग्णालयाची 200 खाटांची नवी इमारत कार्यान्वित होत आहे. यासाठी राज्य सरकारने आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला. आता ही इमारत अतिशय देखणी आणि जिल्ह्यातील नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा देण्यासाठी लवकर कार्यान्वित व्हावी बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रासाठी राज्य सरकारने  आरोग्य विभागाच्या माध्यमातून 62 रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या तसेच कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयु खाटा उपलब्ध करून घेतल्या. आता आणखी 300 खाटा ईसीआरमधून मंजूर करून घेतल्या असून लवकरच बीड येथे अत्याधुनिक कॅथलॅब उभारले जाईल अशी घोषणा या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. बीड जिल्ह्यातील आरोग्यविभागाचे सर्व प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावले आहेत. नव्या 200 खाटांच्या इमारतींमध्ये डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी असे एकुण 125 पदे तातडीने मंजूर केली जातील अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिले. तसेच जिल्ह्यातील 300 पैकी केवळ 14 पदे आता रिक्त आहेत ती भरण्यासाठी प्रयत्न केले जातील. भंडारा आणि अहमदनगरच्या रूग्णालयात जी घटना घडली त्याची पुर्नरावृत्ती राज्यात यापुढे कुठेही होणार नाही यासाठी सर्व शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट करून घेतले आहे असे सांगत सीटी स्कॅन, एमआयआर मशिन या सुविधा आता राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावरील शंभर खाटांच्या शासकीय रूग्णालयात उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणानाही त्यांनी केली. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व जनतेचा विमा सरकारने भरला आहे. याचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने आज विविध विकास कामे सुरू होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा