Subscribe Us

header ads

माता रमाई बहुजनांच्या सांस्कृतिक महामाता आहेत - प्रा.डॉ.मनोहर सिरसाट

बीड स्पीड न्यूज 

माता रमाई बहुजनांच्या सांस्कृतिक महामाता आहेत  - प्रा.डॉ.मनोहर सिरसाट

बीड(प्रतिनिधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तुंग कर्तुत्व माता रमाई च्या त्यागामुळे घडले. माता रमाई या बहुजनांच्या सांस्कृतिक महामाता आहेत असे प्रतिपादन प्रा.डॉ.मनोहर सिरसाट(मराठी विभाग प्रमुख,बलभीम महाविद्यालय बीड) यांनी केले ते देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूह व माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर जयंती उत्सवा प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम तुलसी इंग्लिश स्कूल सभागृह बीड येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यापक जालिंदर तागड हे उपस्थित होते.यावेळी प्राचार्य उमा जगतकर, प्राचार्य अश्विनी बेद्रे, प्राचार्य देविदास निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सम्यक इनकर या विद्यार्थ्यानी रमाई वर गीत सादर केले 'गरीबी जरी त्या संसारात होती,रमाची भिमाला तरी साथ होती'या हृदयस्पर्शी गाण्याने उपस्थितांची डोळे पाणावले होते.यावेळी पुढे बोलताना प्रा.डॉ.मनोहर सिरसाट म्हणाले की, माता रमाईचा स्वाभिमानी बाणा होता. प्रतिकूल परिस्थितीत रमाईने आपले जीवन व्यतीत केले. एवढे दुःख वाटे असतानाही खंबीरपणे रमाईने बाबासाहेबांना साथ दिली. एका बॅरिस्टरची पत्नी असताना देखील त्याचा उपभोग माता रमाईला घेता आला नाही. त्याग,सहनशीलता माता रमाई मध्ये पहावयास मिळते.परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाई एकट्या पडल्या होत्या. रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. जेव्हां माता रमाई आजारी पडल्या आणि काही दिवसांत त्यांची प्राणज्योत मालवली हे कळल्यावर पहाडासारखे महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम साथ रमाई मातेने बाबासाहेबांना दिली आहे. माता रमाई हे करुणेच महाकाव्य आहे. प्रचंड त्यागमूर्ती असं रमाईचं कर्तुत्व आहे हे सर्व संघर्षाचं कर्तुत्व रमाईच्या वाटी आलं आणि ज्यांच्यामुळे प्रज्ञासूर्य घडला आणि त्यांची सावली रमाईला होता आल. त्यांचं कर्तृत्व सद्गदित करणार आहे. मातृत्व असावं असं माता रमाईच कर्तुत्व आहे असे प्राध्यापक डॉक्टर मनोहर सिरसाट यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदिप रोडे यांनी माता रमाई च्या जीवन प्रसंगाचा आढावा घेत माता रमाई मध्ये बुद्धाची करुणा होती असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकाळजे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक योगिता लांडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक प्राध्यापक सुधर्मा सावजी यांनी मानले. यावेळी तुलसी इंग्लिश स्कूल तुळशी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड, तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड, माता रमाई सहकारी पतसंस्था मर्या. बीड येथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा