Subscribe Us

header ads

आॕनलाईन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

आॕनलाईन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणेः-  अध्यात्मिक गजानन ग्रुप ,रुग्वेद प्रसार वाहिनीच्या वतीने 'राज्यस्तरीय आॕनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये लहान मुलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेऊन उत्कृष्ट भाषण केले.योगगुरु सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी मार्गदर्शनपर संयोजन केले.व त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.अध्यात्मिक गजानन ग्रुप अंतर्गत बालसंस्कार वर्ग ,पुणे आणि रुग्वेद न्युज  प्रसार वाहिनी ,नागपूर च्या सौजन्याने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'राज्यस्तरीय आॕनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते.प्रामुख्याने या स्पर्धेत प्रथम नारायणी पंकज विसपुते, द्वितीय सोहम राकेश पडवेकर,तृतीय स्वरा वैभव शहाणे  तसेच लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून मृणाल प्रशांत सोनार यांची निवड करुन त्यांना  विजयी स्पर्धक घोषित करण्यात आले. या स्पर्धेत७ते१६वयोगटातील एकुण ४३स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्रामुख्याने या स्पर्धेत परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणुन  ABSSVSSच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा पुष्पाताई सोनार,रुग्वेद न्युज प्रसार वाहिनीचे संचालक दिनेश येवले,मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे,समुपदेशक शामसुंदर विसपुते,शनैश्वर ट्रस्टचे दिपक जडे,टेक्नोव्हिजनचे एम.डी.नितीन बागुल,मार्गदर्शक आशिष बागुल हे उपस्थित होते.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात अध्यात्मिक गजानन ग्रुपच्या संचालिका सौ.अर्चना सोनार यांनी सर्वांचा परिचय देऊन स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा