Subscribe Us

header ads

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर महिलेने पाली येथील स्मशानभूमीत सुरू केलेले उपोषण घेतले मागे

बीड स्पीड न्यूज 


जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर महिलेने पाली येथील

स्मशानभूमीत सुरू केलेले उपोषण घेतले मागे

 

सदर प्रकरणात चौकशीचा अहवाल फेब्रुवारी अखेर देण्यात येणार

 

बीड, दि.  ५:-- जमीन मावेजा प्रकरणाबाबत पाली येथील स्मशान भूमी मध्ये काहीच दिवसांपूर्वी श्रीमती ताराबाई साळुंखे यांनी उपोषण सुरू केले होते सदर प्रकरणात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली यामध्ये उपोषण कर्त्या श्रीमती साळुंखे यांचा मुलगा अविनाश अर्जुन साळुंखे उपस्थित होते त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरणी पोलीस विभागाकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात तात्काळ चौकशी करण्यात येईल व याबाबतचा अहवाल फेब्रुवारीअखेर सादर करण्यात येईल असे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपोषणकर्त्या श्रीमती साळुंखे यांना देण्यात आले.जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी बैठक घेऊन वीस वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या या  प्रकरणात तातडीने लक्ष घातले आणि पीडित कुटुंबातील सदस्य व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना केल्या तसेच याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहितीचे लेखी पत्र देण्यात आले. त्यांनी दिलेल्या लेखी पत्राचा स्वीकार करून पाली स्मशानभूमी येथे सुरू असलेले उपोषण श्रीमती तारामती अर्जुन साळुंखे यांच्याकडून आज माघारी घेण्यात आले आहे याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.श्रीमती साळुंखे यांनी केलेल्या मुद्देंबाबत विचार करण्यात आला आहे. यापैकी अतिक्रमण काढून घेण्याबाबत उपोषणकर्ते यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल देखील लागला असून त्यामध्ये  सदर अतिक्रमणाची बाब सिद्ध करता येणार नसल्याचे नमूद झाले आहे. तसेच मावेजा कमी मिळाला या अनुषंगाने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणामध्ये मयत अर्जुन कुंडलिक साळुंखे यांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आत्मदहन केले होते  यासाठी पोलीस विभागाकडे गुन्हे दाखल झालेल्या अधिकार्यां बाबत तातडीने  कार्यवाही करून चौकशीचा तपास पूर्ण करून अहवाल फेब्रुवारी अखेर देण्यात येईल. याबाबत सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी संबंधित ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा