Subscribe Us

header ads

नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती व संत श्री नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी (७३६वी)संयुक्त सोहळा संपन्न......

बीड स्पीड न्यूज 

नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती व संत श्री नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी (७३६वी)संयुक्त सोहळा संपन्न......

अलिबाग:-( दि.२१फेब्रुवारी) दि.१९फेब्रुवारी शनिवार रोजी सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांची ७३६वी पुण्यतिथी तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळ्याचे आयोजन नवी मुंबई सुवर्णकार मंडळाच्या वतीने  फ्लोॅट नंबर १३६ बी, सेक्टर-वन /एस, शबरी हाँटेलजवळ, 

नवीन पनवेल येथे समाजाच्या जागेवर आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नवी मुंबईचे उद्योजक श्री राजेंद्रजी रघूनाथशेठ सोनार साहेब होते तर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री संजय गजाननशेठ खरोटे हे होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सचिव हेमकांत सोनार, कोषाध्यक्ष विजय भामरे, कार्याध्यक्ष प्रा. शांताराम सोनारसर उपस्थित होते .सदर 

कार्यक्रमाची सुरुवात संत श्री नरहरी महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभा यात्रेने झाली. संत नरहरी महाराज यांच्या भूमिकेत कु. सारा तुषार  भामरे ही शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण होते.यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "जय नरहरी" च्या जय घोषाने परिसर दुमदुमला होता.प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची 

सुरुवात झाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज व सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री नरहरी सोनार महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व  पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 
यावेळी समाज बंधूभगिनी, बालगोपाल बहूसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव 

हेमकांत सोनार यांनी केले तर मंडळाचे कोषाध्यक्ष श्री विजय जी भामरे साहेबांनी मंडळाचा अहवाल सादर केला. यावेळी भाषणात प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र जी सोनार साहेब म्हणाले की, "समाजासाठी माझे योगदान नेहमी राहील तसेच समाजात युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना यासाठी माझे मार्गदर्शन नेहमी असेन,असे यावेळी सांगितले.अध्यक्षीय भाषणात 

मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे म्हणाले की, आज संत नरहरी सोनार महाराज यांची ७३६वी पुण्यतिथी व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा संयुक्त सोहळा या निमित्ताने सर्व समाज बांधव आपल्या हक्काच्या जागेवर एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजचा हा दिवस समाजासाठी सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाईल.तसेच या कार्यासाठी समाज बांधवांनी महत्वपूर्ण 

योगदान व सहकार्य केल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.शांताराम सोनार सर यांनी संत नरहरी सोनार महाराज यांच्या ७३६व्या पुण्यतिथी निमित्ताने महाराजांवर समाज प्रबोधन केले. ते स्वतः गीतकार असल्याने "धन्य धन्य हे संत शिरोमणी" लिखित अनिल जोजारे (औरंगाबाद)यांच्या आवाजात गायलेले गाणे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.युवा मंडळ अध्यक्ष 

ऋषिकेश थोरात यांनी समाजातील युवकांनी काळची गरज ओळखून एकत्र येण्यासाठी आवाहन केले.महिला मंडळ सचिव सौ.कल्पना ताई सोनार(ऐरोली)यांनी कोविड- कोरोना काळात सुवर्णकार महिला मंडळाने राबविलेले उपक्रम, इ.वेगवेगळ्या उपक्रमाविषयीची  माहिती दिली .या कार्यक्रमात समाजाचे जे बांधव सेवानिवृत्त व आपल्या क्षेत्रात प्राविण्य संपादन तसेच 

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इ.केलेले आहे असे   श्री श्रीनिवास पोतदार, श्री धोंडू शेठ विसपुते, श्री चंद्रकांत चव्हाण, श्री तुषार भामरे,श्री पंकज पोतदार, कु.मानसी दुसाने ,ऋषिकेश पुंजाराम थोरात आदींचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमात बाल कलाकार कु.शिवन्या अभिजित जडे, कु.स्वराली सोनार, कु.वैष्णवी 

वाघ, जेष्ठ कवी मंगलदास मोरे,सोनार गुरुजी, डॉ. दिपाली विसपुते आदींनी संत नरहरी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, गाणे,कविता वाचन,आरत्या  इ.सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला.या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबई सुवर्णकार मंडळ, नवी मुंबई सुवर्णकार महिला मंडळ, सुवर्णकार युवक मंडळ आदी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, समाज बांधव आदी बहुसंख्येने उपस्थित होते. नवी मुंबई सुवर्णकार समाजाचे संस्थापक सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.समाजासाठी आमची नेहमी मदत राहील,असे यावेळी सांगितले.कार्यक्रम स्थळी नोंदणी कक्ष, पदवीधर मतदार नोंदणीकक्ष,पाणी व्यवस्था, फोटोग्राफी, पाणी व्यवस्था,भोजन व्यवस्था, सँनिटायझर इ. यासाठी समाज बांधवांचे सहकार्य लाभले.सदर  कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन नवी मुंबई सुवर्णकार मंडळ पदाधिकारी व सदस्य यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करणे साठी सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहून  उत्स्फूर्तपणे सहकार्य केले त्यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.या यशस्वी कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन सौ.अनिताताई उदय विभांडिक कु.मानसी दुसाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.शांताराम सोनारसर (पाली, श्रीक्षेत्र गणपतीचे)यांनी मानले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा